नंदुरबारमध्ये अडीच हजाराहुन आधिक बालके तीव्र कुपोषित
नंदुरबारमध्ये अडीच हजाराहुन आधिक बालके तीव्र कुपोषित Saam tv
महाराष्ट्र

नंदुरबारमध्ये अडीच हजाराहुन आधिक बालके तीव्र कुपोषित

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नंदुरबार : कोरोनाच्या (Covid 19) भीतीमुळे उपचाराअभावी कुपोषणात (Malnutrition) वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये (Nutrition Rehabilitation Center) कुपोषित बालके उपचारासाठी दाखल झाली आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा, मोलगी, धडगाव परिसरात आदिवासी पाड्यांवर कुपोषणाचा विळखा कायम आहे. (More than two and a half thousand children are severely malnourished in Nandurbar)

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या भीतीमुळे कुपोषित बालकांना दिला जाणाऱ्या पोषण आहार वाटपाच्या अडचणीमुळे कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या चार तालुक्यातील कुपोषित बालकांचे स्क्रिनिंग सुरू असून आतापर्यंत 14 हजार 92 बालकांची तपासणी झाले असून त्यात अडीच हजारपेक्षा जास्त बालके तीव्र कुपोषित आढळून आले आहे. कोरोना काळात भीतीमुळे या भागातील पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये उपचारासाठी पालक मालकांना दाखल करत नसल्याचे चित्र होते.

परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये कुपोषित बालक उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. त्यासाठी रुग्णालयातील काही बेड कोरोनाच्या तिसरे लाटे साठी बेड आरक्षित करण्यात आले आहेत. त्यामुळे कुपोषित बालकांच्या उपचारासाठी बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे दुर्गम भागातील येणाऱ्या कुपोषित बालकांच्या उपचाराअभावी मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोरोनापेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण झालेल्या कुपोषित बालकांवर वेळेवर योग्य तो उपचार करणे गरजेचे असून आरोग्य विभागाने यात सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी होत आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KKR vs DC: केकेआरच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीची बत्ती गुल; विजयासाठी कोलकताला १५४ धावांचे आव्हान

Maharashtra Politics: राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार, नारायण राणेंसाठी घेणार सभा

Amit Shah यांच्या हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं, मोठा अनर्थ टळला!

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

SCROLL FOR NEXT