Nandurbar Breaking News Saamtv
महाराष्ट्र

Nandurbar Land collapsed: मोठी दुर्घटना टळली! चांदसैली घाटात दरड कोसळली; २ तासांपासून वाहतूक ठप्प

Nandurbar Breaking News: या दुर्घटनेनंतर दोन तासांपासून घाटातील वाहतूक ठप्प झाली असून ही दरड आता कधी बाजूला होणार? आणि रस्ता कधी सुरू होणार? याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नाही.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. ८ जून २०२४

नंदुरूबार जिल्ह्यात दरड कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटात दरड कोसळली. वाहतुक सुरू असतानाच ही दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसून मोठी घटना टळली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. वाहतूक सुरू असतानाच ही दरड कोसळली मात्र सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. या दुर्घटनेनंतर दोन तासांपासून घाटातील वाहतूक ठप्प झाली असून ही दरड आता कधी बाजूला होणार? आणि रस्ता कधी सुरू होणार? याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नाही.

या घाटात नेहमी दरड कोसळत असतात. परंतु स्थानिक आमदार आणि बांधकाम विभाग नेहमी दुर्लक्ष करत असतात. घाटातील रस्ता तळोदा आणि धडगाव तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. परंतु आमदार के.सी. पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांनी दरड कोसळण्याच्या बाबतीत कधीही ठोस भूमिका घेतली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

तसेच हा भाग दरड प्रवण भाग असून बांधकाम विभागाकडून याकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जाते. यावर्षीही या भागात पहिल्याच पावसात दरडी कोसळल्याच्या घटना घडल्याने बांधकाम विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, घाटातील वाहतुक ठप्प झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वीच भयंकर घडलं, ५० भाविकांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली

कॉकरोच जनता पार्टी अन् सरकारमध्ये खलबतं, मध्यरात्री आणखी एक मोठी मागणी मान्य

Beauty Tips: मानेवर आलेले चामखीळ हलक्यात घेऊ नका! असू शकतात 'या' गंभीर आजाराचे संकेत

Mirchi Bhaji Recipe : रिमझिम पावसात बनवा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरची भजी, फक्त ५ मिनिटांत रेसिपी तयार

ITR, LPG ते बँकिंग, १ ऑगस्टपासून बदलणार 5 मोठे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

SCROLL FOR NEXT