Dhule Accident News Saamtv
महाराष्ट्र

Nandurbar Accident: ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात! दोन वाहनांची समोरासमोर धडक; ४ जखमी

Dhule Accident News: धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात झाला.या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. १४ जानेवारी २०२४

Dhule Surat Highway Accident:

नंदुरबारच्या धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तवेरा व ओमनी कार यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर (Dhule Surat Highway Accident) कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात झाला. साक्रीहून नवापूरच्या दिशेने जाणारी तवेरा कार आणि विसरवाडीहून साक्रीच्याविरुध्द दिशेने जाणाऱ्या ओमनी कारला ओव्हर टेक करण्याच्या नादात धडक दिल्याने ही घटना घडली. या अपघातात ओमनी कार वाहनातील चार जण जखमी असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातात जखमी झालेले प्रवासी हे चाळीसगावमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्तांना पोलीस वाहनाने तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय कुवर यांनी लागलीच उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान, कोंडाईबारी घाटात महामार्गावर एका बाजूला पुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे अपघातीची मालिका थांबता थांबत नसून यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Khanna : राजेश खन्ना यांनी 13 वर्षीय अभिनेत्रीला केली होती किस, सुपरस्टारबद्दल धक्कादायक दावा

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला

धक्कादायक! पोटच्या ३ मुलींचा जीव घेतला, मग आपल्या आयुष्याचाही दोर कापला, आईने का उचललं टोकाचं पाऊल?

Dharashiv : गुरुजी, आमच्या शाळेतून जाऊ नका ना! म्हणत विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला | पाहा VIDEO

Pune Crime: मंदिरात घेऊन गेला, मंत्रोच्चार करत अघोरी विधी; अंगाऱ्याचा पेढा खायला दिला, नंतर महिलेसोबत...

SCROLL FOR NEXT