नंदुरबार : २३ गुन्हे नावावर असलेला दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात SaamTvNews
महाराष्ट्र

नंदुरबार : २३ गुन्हे नावावर असलेला अट्टल दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात

तीन लाख ३५ हजार रुपयांच्या आठ दुचाकी जप्त

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार, धुळे, जळगाव व गुजरातमध्ये दाखल तब्बल २३ गुन्हे नावावर असलेल्या दुचाकी चोरट्याला पकडण्यात नंदुरबार पोलिसांना यश आले आहे. ३ लाख ३५ हजार रुपयांच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासह गुजरातमधील दुचाकी चोरीचेही गुन्हे यामुळे उघडकीस आले आहेत.

हे देखील पाहा :

खोजल्या वण्या तडवी (रा. बिजरीगव्हाण, ता. अक्कलकुवा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, सुग्या सन्या तडवी असे फरार संशयिताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे प्रमाण पाहता चोरट्यांना जेरबंद करण्याच्या सूचना प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास सुरू केला आहे.

नंदुरबारमधील भोणे फाटा परिसरात एकजण कमी किंमतीत दुचाकी विकत असल्याची माहिती अधीक्षक पवार यांना मिळाली त्यांनी तातडीने एलसीबीचे निरीक्षक कळमकर यांना ही माहिती दिली. त्यांनी दोन पथके तयार करून संशयिताच्या मुसक्या आवळण्यास पथकाला सांगितले. पथकाने भोणे फाटा परिसरात सापळा लावला असता, तेथे टपरीवर दोघेजण विनानंबरच्या दुचाकीसह दिसले. त्यांना पोलीस आल्याची चाहुल लागताच ते दुचाकी सोडून पळू लागले. त्यातील एकाला पाठलाग करून ताब्यात घेतले असता, त्याने त्याचे नाव खोजल्या वण्या तडवी असल्याचे सांगितले.

त्याच्याकडून गुजरातमधून चोरून आणलेली दुचाकी जप्त करण्यात आली. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने चुलतभाऊ सुग्या सन्या तडवी याच्या मदतीने दुचाकी चोरी करत असल्याचे सांगितले. त्याच्याकडून एलसीबीने ३ लाख ३५ हजार रुपयांच्या एकूण ८ दुचाकी जप्त केल्या. दरम्यान, अटक करण्यात आलेला खोजल्या तडवी याच्यावर मालमत्ताविरुद्धचे तब्बल २३ गुन्हे नंदुरबार, धुळे, जळगाव व गुजरातमध्ये दाखल आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT