Nandurbar Agriculture Officers Fraud Case Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar : मृत लिपिकाच्या नावे बनावट व्हाऊचर तयार केले, खोट्या स्वाक्षरीही केल्या; लाखोंचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना बेड्या

Nandurbar Agriculture Officers Fraud Case : नंदुरबारच्या नवापूर कृषी कार्यालयात २० लाखांहून अधिक जीएसटी रकमेचा अपहार उघड झाला असून बनावट व्हाऊचर तयार करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • नंदुरबारमध्ये २० लाखांचा जीएसटी घोटाळा उघड

  • बनावट व्हाऊचरद्वारे शासकीय निधीचा अपहार

  • एका आरोपीला अटक; दुसऱ्यावर गुन्हा दाखल

  • पोलिसांकडून सखोल तपास सुरू

नंदुरबारमधील नवापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तब्बल २० लाख ५० हजार १४८ रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात तत्कालीन तालुका कृषी अधिकारी तथा निवृत्त कृषी उपसंचालक वसंत धर्मराज चौधरी आणि कर सल्लागार राकेश भालचंद्र कोठावदे यांनी संगनमताने वस्तू व सेवा कर (GST) रकमेचा अपहार केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या दोघांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राकेश कोठावदे याला अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१८ ते २०२० या कालावधीत वसंत चौधरी हे नवापूर तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या काळात मृद व जलसंधारण योजनेअंतर्गत विविध कामे करण्यात आली होती. या कामांवर शासन नियमानुसार जीएसटी भरणे आवश्यक होते. त्यासाठी वसंत चौधरी यांनी राकेश कोठावदे यांच्याकडे सुमारे ३० लाख ३३ हजार १७० रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. मात्र, राकेश कोठावदे याने यापैकी केवळ ९ लाख ८३ हजार ०२२ रुपयेच ई-पेमेंटद्वारे शासनाकडे जमा केले. उर्वरित २० लाख ५० हजार १४८ रुपये वंसत चौधरी आणि राकेश कोठावदे यांनी संगनमताने अपहार करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.

हा घोटाळा लपवण्यासाठी आरोपींनी अत्यंत चुकीचा मार्ग अवलंबला. कार्यालयातील मयत लिपिक किरण झिंगा कन्हैय्या यांच्या नावाने बनावट व्हाऊचर तयार करण्यात आले. त्या व्हाऊचरवर संबंधित रक्कम परत दिल्याचे दाखवण्यात आले. इतकेच नव्हे तर, त्या कागदपत्रांवर मयत व्यक्तीच्या खोट्या स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. तपासात हे व्हाऊचर पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले असून, या प्रकारामुळे गुन्ह्याची गंभीरता अधिकच वाढली आहे.

या प्रकरणी सध्याचे तालुका कृषी अधिकारी रविशंकर गेमसिंग पाडवी यांनी तक्रार दिल्यानंतर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अभिषेक दिलीप पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक अभिजित किशोर अहिरे यांनी तत्काळ कारवाई करत तपास सुरू केला आहे. भारतीय दंड संहितेतील विश्वासघात, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि संगनमत या गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे करत आहेत. शासकीय निधीच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनीच असा घोटाळा केल्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार का, आणि या घोटाळ्यामागे आणखी कोणाचा हात आहे का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT