Red Chilli Price Slashed in Vashi's APMC Market | Saam Tv News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar APMC Market: मिरचीचा ठसका! नंदुरबार बाजार समितीत विक्रमी आवक; ३५० कोटींची उलाढाल

Gangappa Pujari

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. ३ मे २०२४

नंदुरबारचे मिरची मार्केट हे महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश राज्यात देखील प्रसिद्ध आहे. यावर्षी नंदुरबार बाजार समितीत मिरचीची विक्रमी अशी 3 लाख 25 हजार क्विंटल एवढी आवक झाली असून या हंगामातील ही विक्रमी आवक सांगण्यात येत आहे.

नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीने विक्रमी आवक केली असून गेल्या १० ते १५ वर्षातील ही आवक विक्रमी असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी नंदुरबार बाजार समितीत मिरचीची विक्रमी अशी ३ लाख २५ हजार क्विंटल एवढी आवक झाली असून या हंगामातील ही विक्रमी आवक आहे. या मधून जवळपास ३५० कोटी रुपयांची उलाढाल बाजार समितीत झाली आहे. दरवर्षी बाजार समितीमार्फत ४० ते ५० मिरची पथाऱ्या उभारण्यात येत होत्या. परंतु यावर्षी ७० ते ८० मिरची पथाऱ्या उभारण्यात आल्या आहेत.

जवळपास रोज ७०० ते ८०० वाहनातून मिरची विक्री होत होती आता मिरची हंगाम अंतिम टप्प्यात आला असून एप्रिलपर्यंत हंगाम संपत असतो परंतु आता देखील ८० ते १०० वाहनातून जवळपास १००० ते १५०० क्विंटल मिरची विक्री बाजार समिती होत आहे. त्यामुळे मिरचीचे मार्केट तेजीत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, यावर्षी शेतकऱ्यांना कापूस व पपई यामध्ये पुरेसा भाव न मिळाल्याने नुकसान झाले असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे येत्या हंगामात शेतकरी मिरची उत्पादनाकडे वळतील यामुळे जवळपास दीडपट मिरची लागवडीचे क्षेत्र वाढेल अंदाज बाजार समितीकडून वर्तवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT