nandurbar Accident News : नंदूरबारमधील कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली.  saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident : कोंडाईबारी घाटात अनर्थ घडला! बस-ट्रकचा भीषण अपघात; ८ जखमी, ३ प्रवासी गंभीर

Saam Tv

सागर निकवाडे, नंदूरबार

Nandurbar ST Bus-Truck Accident : नंदूरबार जिल्ह्यात भीषण अपघात झाला. नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील ८ प्रवासी जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळं वाहतूक कोंडी झाली होती.

जामनेर - सूरत बसमध्ये साधारण ५५ प्रवासी होते. नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात बस आली असता, मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही बस पुढील ट्रकला जाऊन धडकली. यात बसचा मागील आणि पुढील भाग दबला गेला. बसमधील ८ प्रवासी जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

धडकेनंतर प्रवासी प्रचंड घाबरले

घाटात बस आल्यानंतर एका ट्रकनं पाठीमागून धडक दिली. धडक जोरदार होती. त्यामुळं ही बस पुढे असलेल्या ट्रकला धडकली. अपघातानंतर प्रवासी प्रचंड घाबरले होते. घटनेनंतर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पथक पोहोचले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी प्रवाशांना नंदूरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तर बसमधील उर्वरित प्रवाशांना वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करून देण्यात आली.

अपघातांचा घाट

नागपूर-सूरत राष्ट्रीय महामार्गावरील या अपघातामुळं काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कोंडाईबारी घाटात अपघाताच्या घटना घडत आहेत. मागील दोन ते तीन दिवसांत दोन-तीन अपघात झाले होते. आज बसचा अपघात झाला. त्यामुळं अपघात रोखण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: ठाकरे-काँग्रेसचं फाटलं? पत्रकार परिषदेत मविआतला विसंवाद चव्हाट्यावर; VIDEO

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT