Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: बॅटरीचा स्‍फोट झाल्‍याने कॅबिनमध्‍ये आग; ट्रक उलटून चालकाचा मृत्‍यू

बॅटरीचा स्‍फोट झाल्‍याने कॅबिनमध्‍ये आग; ट्रक उलटून चालकाचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : भाताचा भुसा भरून जाणाऱ्या ट्रकच्‍या बॅटरीचा स्फोट होऊन कॅबीनमध्ये लागलेल्या आगीमुळे चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक झाडावर आढळून झालेल्या (Accident) अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची (Nandurbar News) घटना रात्री मेंढवड (ता. तळोदा) फाट्याजवळ घडली. तर दुसऱ्या घटनेत रनाळे (ता. नंदुरबार) येथे डंपर उलटून झालेल्या अपघातात सहचालकाचा दबून मृत्यू झाला. (Maharashtra News)

रायपूर (छतीसगड) येथून भाताचा भुसा भरून ट्रकचालक दिपसिंह खिमसिंग राव (वय ५५) राजकोट येथे जात होते. त्यावेळी मेंढवड (ता. तळोदा) गावाचा फाट्याजवळ ट्रक गरम होऊन बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे ट्रकच्या कॅबिनमध्ये आग लागली. त्या आगीमुळे ट्रक चालक दिपसिंग रावत होरपळला. त्याचा हाताला चटके लागले. त्यामुळे त्याचा ट्रकचा वेगावरील नियंत्रण सुटल्‍याने ट्रक रस्त्याचा लगत असलेल्या झाडावर जोरात आढळून ट्रक रस्‍त्याचा बाजूला उलटला. या अपघातात दबल्याने गंभीर जखमी होऊन दिपसिंग रावत यांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना रनाळे (ता. नंदुरबार) येथे घडली. रनाळे गावातील बजरंग मंदीर टेकडीजवळून जात असतांना डंपरवरील चालक गणेश देविदास पटेल याचा ताबा सुटल्याने डंपर पलटी झाला. त्या डंबरमध्ये असलेला सहचालक रविंद्र हरी मराठे (वय ५०, रा.रनाळे) यांचा दबून मृत्यू झाला. अपघातानंतर माहिती न देतांच गणेश पटेल याने तेथून पलायन केले. याबाबत मनोज राजाराम मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात डंपर चालक गणेश पटेल याच्याविरूध्द अपघात व रविंद्र मराठे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

SCROLL FOR NEXT