Ahmednagar News: पद्मश्री होऊन माझा गावाला काय उपयोग?; राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केली खंत

पद्मश्री होऊन माझा गावाला काय उपयोग?; राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केली खंत
Rahibai Popere
Rahibai PopereSaam tv

सचिन बनसोडे

अकोले (अहमदनगर) : देशी बियाणांचे संवर्धन करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांच्या कोंभाळणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुवस्था झाली. रस्ते व्यवस्थित नसतील, तर पद्मश्री (Padmashree) होऊन माझा गावाला काय उपयोग? अशी खंत व्यक्त करत राहीबाईंनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. (Tajya Batmya)

Rahibai Popere
Cyber Crime: केवायसी करणे पडले महागात; ऑनलाईन ९७ हजार रुपयांत गंडा

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे या दुर्गम गावातील राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणांसंदर्भात केलेल्या कामामुळे त्यांना विविध पुरस्कारांसह पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मात्र त्यांच्या कोंभाळणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांसह अभ्यास दौऱ्यानिमित्त राहीबाईंच्या बिज बँकेला भेट देण्यासाठी येणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

उपोषणाला बसण्याचा इशारा

मेडिकल इमर्जन्सी, शाळा, कॉलेज तसेच इतरही कामांसाठी गावातून बाहेर जाणाऱ्यांना खराब रस्त्यांवरून प्रवास करणे जिकरीचे बनते. यासंदर्भात वारंवार आवाज उठवूनही दखल घेतली जात नसल्याची खंत पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केली. रस्ते व्यवस्थित नसतील; तर पद्मश्री होऊन माझा गावाला काय उपयोग असा उद्विग्न प्रश्न उपस्थित करत उपोषणाला बसण्याचा इशारा राहीबाईंनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com