Fraud
Fraud Saam tv
महाराष्ट्र

देवाच्‍या लाकडी मुर्तीच्‍या नावाने तमिळनाडूतील एकाची पावणेदोन लाखात फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : विष्णू भगवानची लाकडी मुर्ती देतो, असे नाव करून एकाकडून वेळोवेळी एक लाख ७२ हजार रुपये उकळून फसवणूक केली. तसेच संबधितास प्रकाशा येथील तापी पुलाखाली नेऊन मारहाण करण्याचा प्रकार घडला. याबाबत नंदुरबार (Nandurbar) शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी ते ६ मे २०२२ दरम्यान घडली. (nandurar crime news wooden idol of God fraud two lakh rupees)

विशाखापट्टन (तमिळनाडू) येथील कापड दुकानावर खासगी नोकरी करणारा जिंगाली रवींद्र यादव रेल्वेने प्रवास करत असताना अकोला (Akola) स्टेशन पास केल्यानंतर करण पवार नामक व्यक्ती भेटला. त्याने यादव यांना ५० हजार रुपये किमतीची विष्णू भगवानची लाकडी मुर्ती २५ हजार रुपयात देतो, असे आमिष (Money Fraud) दाखविले. त्यामुळे फोन पेद्वारे यादव याने त्यास रक्कम पाठविली. त्यानंतर हॉटेल गौरव प्लाझा येथे दोन वेळेस हजार-हजार रुपये दिले. त्यानंतर करण पवार याचा मित्र मोबाईल (८०१०८३३१७४) धारक मनोज पवार याने तीच मुर्ती पाहिजे असल्यास दीड लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर यादव याने नेहरू चौकातून एचडीएफसी बॅंकेतील एटीएमद्वारे दीड लाख रुपये काढून जमविले.

साथीदारांच्‍या मदतीन मारहाण

त्यानंतर ६ मेस मनोज पवार याने मोटारसायकलीवर बसवून प्रकाशा येथे तापी नदीच्या पुलाखाली नेले. तेथे त्यांचा दोन साथीदारांपैकी एकाने सुरा दाखवून पोटात बुक्का मारून मारहाण केली. तसेच दीड लाखाची रक्कम व दहा हजाराचा मोबाईल हिसकावून घेतला. अशी फिर्याद जिंगाली रवींद्र यादव यांनी दिली आहे. त्यानुसार करण पवार व मनोज पवार या व्यक्तींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात (Police) विश्‍वास संपादन करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर पुढील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT