Nandigram Express Fire  Saam tv
महाराष्ट्र

Nandigram Express Fire : नंदीग्राम एक्स्प्रेसला अचानक आग, प्रवाशांची एकच धावाधाव

Nandigram Express Fire News : नंदीग्राम एक्स्प्रेसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ट्रेनला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

फैय्याज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

ठाणे : कसाऱ्यातून मोठी बातमी हाती आली आहे. कसाऱ्याजवळ नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कोचला आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आग लागल्यानंतर नंदीग्राम एक्स्प्रेस कसारा सिग्नल जवळ थांबवण्यात आली आहे. प्रवासी सुखरूप असून या एक्स्प्रेसला आग नेमकी कशामुळे लागली, याची माहिती मिळालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आगीच्या घटनेने एक्स्प्रेसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कॉम्प्रेसरला आग लागल्याची घटना घडली. नंदीग्राम एक्सप्रेसला आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला तातडीने कळवण्यात आलं.

एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर ट्रेन कसारा जवळील सिग्नलजवळ थांबवली. या घटनेत प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना तातडीने ट्रेनमधून उतरवण्यात आलं. या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे.

नंदीग्राम एक्स्प्रेसच्या एका कोचजवळ आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची घटना घडताच अग्निशमन दलाचे जवान मदतीला धावले. या अग्निशमन दलाच्या जवानांनी पोहोचून कोचजवळील आगीवर पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT