...म्हणून सोशल मिडीयावरती नंदीबैलवाल्याचा 'तो' फोटो होतोय व्हायरल! विजय पाटील
महाराष्ट्र

...म्हणून सोशल मिडीयावरती नंदीबैलवाल्याचा 'तो' फोटो होतोय व्हायरल!

नंदीबैलाच्या दोन्ही शिंगांमध्ये पैसे घेण्यासाठी स्कॅनर बसवलेला दिसत आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली :  आजकाल प्रत्येकजण डिजिटल Digital झाला आहे. छोट्या-मोठ्या आर्थिक देवाघेवाणींसाठी कॅश न देता प्रत्येकजण Paytm, PhonePe, Gpay अशा काही अॅपचा App वापर करत असतो. आणि हि नवीन देवाण घेवानूची साधन नसतील तर अनेकांना अडचणी येत असतात म्हणूनच की काय आता हीच नवीन साधनं प्रत्येकाला वापरण गरजेचच झालं आहे.अशातच आता लोककलावंतही डिजिटल झाले आहेत. एका नंदीबैलवाल्याची Nandibalwala फोटो सध्या सोशल मिडीयावर Social Media मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये नंदीबैलाच्या दोन्ही शिंगांमध्ये पैसे घेण्यासाठी स्कॅनर बसवलेला दिसत आहे. (Nandibalwala's photo is going viral on social media)

हे देखील पहा -

'नंदीबैल - डिजिटल कलीयुगाचा महिमा' या नावाने या फोटोने सोशल मिडीयावरती धुमाकुळ घातला आहे. सण म्हटंल की सुगीच्या दिवसांना सुरुवात होते. तसेच आपल्याकडे लोककलेला वेगळ महत्व आहेच आणि या लोककलावंतांचा विशेष आदर आणि कौतुक देखील आपण मनापासून करत असतो.अशातच सुगीच्या दिवसांमध्ये अनेक लोककलावंत दारी येतात आणि त्यांच्या कलेला दाद म्हणून त्यांना काहीतरी दान देण परंपरा खूप वर्षांपासून आपल्याकडे रुजली आहे.

कडकलक्ष्मी, पिंगळा, नंदीबैल, वासुदेव असे अनेक परंपरा जपणारे कलाकार आपल्याकडे येत असतात. काही भविष्यवाणी करतात, काही देवांचा महिमा सांगतात तर काही पावसाच्या येण्याच भाकीत तरतात या सर्वांचा फिरण्याचा, येण्याचा कालावधी हंगामा प्रमाणे बदलत राहतो. एकेकाळी लोककलावंत धनधान्याची मागणी करत असत हे कलावंत आता या स्कॅनकोडचा ScanCode एक फलकच सोबत घेऊन फिरत आहेत. या स्कॅनकोडचा सर्रास वापर सुरु झाला आहे. आता एका कलावंताचा फोटो सध्या सोशल माध्यमावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे काळानूसार बदलाव लागतं म्हणतात तेच खरं असल्या प्रत्येय या फोटोमधून येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT