- अजय सोनवणे
नांदगाव शहरातील सावता नगर भागात गेल्या महिन्याभरापासून पाणीपुरवठा झालेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील महिलांनी रिकामे हंडे घेत मालेगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन (rasta roko andolan at malegaon highway) केले. या आंदाेलनामुळे मालेगाव महामार्गावरील वाहतुक काही काळ खाेळंबली हाेती. (Maharashtra News)
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनला आहे. तालूक्यातील धरणातील पाणी साठा हळू हळू हिवाळ्यातच संपुष्टात येत असल्याने नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यात माेठा अडसर हाेऊ लागला आहे.
नांदगाव शहरातील सावता नगर भागात गेल्या महिन्यांभरापासून पाणीपुरवठा झालेला नाही. यामुळे या परिसरातील महिलांनी रिकामे हंडे घेत मालेगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अखेर पोलिसांनी पुढाकार घेत नगरपालिका अधिकारी व आंदोलकांशी चर्चा घडवून आणली. यावेळी पालिका अधिकारी यांनी पाणीपुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन आंदाेलकांना दिले. त्यानंतर आंदोलक महिलांनी मालेगाव महामार्ग माेकळा करुन दिला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.