Pandurang Vagatkar, a mentally ill man, chained inside a tin shed in Wakad village, Nanded, due to safety concerns. Saam Tv
महाराष्ट्र

Nanded News: आईनेच मुलाला झोपडीत बांधून ठेवलं, पाहा VIDEO

Nanded Mother Chains Son In Field: नांदेड जिल्ह्यातील वाकद गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानसिक रुग्ण असलेल्या पांडुरंग वागतकर याला त्याच्या आईने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सहा महिन्यांपासून बांधून ठेवले आहे.

Omkar Sonawane

  • वाकद गावातील आईने मानसिक रुग्ण मुलाला शेतात शेडमध्ये बांधून ठेवलं आहे.

  • पांडुरंग वागतकर गावातील मुलांना मारहाण करतो, म्हणून त्याचा त्रास टाळण्यासाठी हा उपाय.

  • नांदेड व पुण्यात उपचार झाले तरी फरक न पडल्याने आईला हा कठोर निर्णय घ्यावा लागला.

  • प्रशासन व सामाजिक संस्थांनी लक्ष घालावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेडच्या भोकर तालुक्यातील वाकद गावात धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पांडुरंग वागतकर हा मनोरुग्ण गावातील लहान मुलांना मारहाण करून गाड्यांच्या काचा फोडतो म्हणून, चक्क जन्मदात्या आईनेच त्याला शेतात पत्राचे शेड करून बांधून ठेवले आहे. वृद्ध लक्ष्मीबाई वागतकर रोज मनोरुग्ण मुलाला सकाळ,सायंकाळी जेवण नेऊन देते.मनोरुग्ण पांडुरंग वागतकर याच्यावर नांदेड रुग्णालय व पुण्यात सुद्धा उपचार करण्यात आले आहेत.

मात्र त्याच्यात कोणताही फरक पडल्याचे दिसून आले नाही, त्यानंतर मनोहर पांडुरंग वागतकर त्याचा उपद्रव वाढल्याने शेवटी काळजावर दगड ठेवून जन्मदात्या आईनेच त्याला शेतात बांधून ठेवल आहे.

गेल्या सहा महिन्यापासून हा मनोरुग्ण शेतात बांधून असल्याने त्याच्या शरीराला जखमा झाल्या आहेत.प्रशासनाने त्याची सुटका करून व्यवस्थित उपचार करावेत अशी मागणी त्याची आई लक्ष्मीबाई वागतकर यांनी केली आहे. तर गावचे सरपंच विकास वाकेकर यांनी याबाबत आम्ही पोलिसांना माहिती दिली मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही असं सांगत जिल्हाधिकारी व सामाजिक संस्थेने पुढाकार घ्यावा अस आवाहन सरपंचांनी केल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Officers Promotion: राज्यातील १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश; वाचा संपूर्ण लिस्ट

Bogus Voter Scam: राहुल गांधींकडून पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड; सांगितली नोंदणीची मोडस ऑपरेंडी

Vantara:'माधुरी'नंतर वनताराचा 'गौरी'वर डोळा? गौरी हत्तीणीसाठी 3 कोटींची ऑफर?

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

SCROLL FOR NEXT