Nanded Crime Saam Tv
महाराष्ट्र

Nanded : लॉजमध्ये बहिणीला रंगेहात पकडलं, घाबरलेल्या तरुणीची लॉजवरुन उडी, भावाने तिच्या मित्राला भोसकलं; नांदेडमध्ये खळबळ

Nanded Crime : एका तरुणाने त्याच्या महाविद्यालयात जाणाऱ्या बहिणीला तिच्या मित्रासह लॉजच्या रुममध्ये रंगेहात पकडले. त्यानंतर तरुणाने त्याच्या मित्रांसह बहिणीच्या मित्राला बेदम मारहाण केली.

Yash Shirke

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही, प्रतिनिधी

नांदेडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या ३ तरुणी त्यांच्या मित्रांसह एका लॉजवर गेल्या होत्या. तिघींपैकी एका तरुणीच्या भावाला लॉज प्रकरणाची कुणकुण लागली. तरुणीचा भाऊ त्याच्या मित्रासह लॉजेवर गेला. तरुणीच्या भावाने तरुणीला मुलासह रंगेहात पकडले. या प्रकरणामुळे मोठा राडा झाला. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

तीन महाविद्यालयीन तरुणी या त्यांच्या-त्यांच्या मित्रांसह एका लॉजवर गेल्या होत्या. या तरुणींपैकी एका तरुणीच्या भावाला याची कुणकुण लागली. त्याने लॉज गाठत बहिणीला रंगेहाथ पकडले. बहिणीला आणि तिच्या मित्राला एकाच खोलीत रंगेहात पकडल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. घाबरुन तरुणीने पहिल्या माळ्यावरुन उडी मारली. या प्रयत्नात तिचा हात मोडला. दुसऱ्या बाजूला तरुणीच्या मित्राला तिच्या भावाने आणि त्याच्या साथीदाराने लॉजबाहेर आणले. भोकर फाट्याजवळ तरुणीच्या मित्राला बेदम मारहाण केली, त्याच्या पोटात खंजीर भोसकला. तरुणीच्या भावाने केलेल्या हल्ल्यात तिच्या मित्राला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसऱ्या बाजूला लॉजच्या पहिल्या मजल्यावरुन हात मोडून घेणाऱ्या तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मोठा ट्वीस्ट

ही घटनेची माहिती समोर येताच या प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला. कॉलेज सुटल्यानंतर आम्हा तिघींना बळजबरी करत ३ तरुणांनी दुचाकीवर बसवले आणि एका लॉजवर नेले. त्यांनी आमच्यावर अत्याचार केला, असे फिर्याद पीडित तरुणीने दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांवर अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या बाजूला, मारहाण झालेल्या तरुणाने देखील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरुन तरुणीच्या अल्पवयीन भावासह तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अजबगजब प्रकरणी सखोल तपास सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक अभीनाश कुमार यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

SCROLL FOR NEXT