संजय सुर्यवंशी, साम टीव्ही
नांदेड : नवऱ्याचा विरह सहन न झाल्यामुळे बायकोनेही त्याच ठिकाणी आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना सोलापूरमध्ये घडली होती. गुढी पाडव्याच्या रात्री नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नवरा गेल्यामुळे अतीव दुख झालेल्या पत्नीनेही दुसऱ्या दिवशी आयुष्य संपवलं. या घटनेला तीन दिवस उलटत नाही तोवर नांदेडमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर त्याच ठिकाणी पत्नीचा मृतदेह आढळला असल्याचं समोर आलं आहे.
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथे ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीने ज्याठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली त्याचठिकाणी पत्नीचा देखील मृतदेह आढळला आहे. या घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीचं नाव बाबासाहेब शिंदे आणि पत्नीचे नाव रुख्मिणीबाई शिंदे असं आहे. दोघांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये घरगुती वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.
नेमकं काय घडलं?
मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील शेतकरी बाबासाहेब बाजीराव शिंदे पत्नी रुक्मिणी बाबासाहेब शिंदे या दाम्पत्याची एकाची गळाफास तर दुसऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना काल ४ एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान स्वतःच्या शेतात घडली. रोही पिंपळगाव येथील शेतकरी बाबासाहेब बाजीराव शिंदे आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी बाबासाहेब शिंदे हे दोघेही रोही पिंपळगाव आपल्या घरून सकाळी नेहमीप्रमाणे शेतामध्ये गेले होते. परंतु दुपारी एक वाजेच्या दरम्यान बाबासाहेब शिंदे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचं दिसून आलं. तर पत्नी त्याच ठिकाणी मृत्यू अवस्थेत जमिनीवर दिसून आली. या घटनेची माहिती आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दिल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती रोही पिंपळगाव येथील पोलीस पाटील यांनी मुदखेड पोलिसांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी बेन, मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक शिंदे, बिट जमादार दिलीप चक्रधर, रमेश पुणे गोविदवाड, बाळवत कदम, प्रकाश सुनकमवार यांच्या सह अदी पोलिस घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी गेले असून अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.