मुसळधार पावसामुळे नांदेडमधील सहा गावं पाण्याखाली
पुरामुळे ८० नागरिक अडकले, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू
४० ते ५० म्हशींचा मृत्यू, शेती पिकांचे मोठे नुकसान
महामार्गावर पूल खचल्याने दुचाकी अपघात, महिला गंभीर जखमी
गेल्या काही तासांपासून राज्यभरात पावसानं थैमान घातलं आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्येही पावसानं हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे नांदेडमधील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. नांदेडमधील अनेक गावांना पुरानं वेढा घातला आहे. रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस बरसला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सहा गावं पाण्याखाली गेले आहेत. यापैकी २ गावातील ८० नागरिक अडकले आहेत. तर, ४० ते ५० म्हशींचा मृत्यू झाला आहे.
रस्त्याला तळ्याचे स्वरूप
नांदेडच्या देगलूर मुक्राबाद रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या कार आणि गाडी पाण्याखाली गेले आहेत. दोरीच्या सहाय्याने गाड्या पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. लेंडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे.
४० ते ५० म्हशींचा मृत्यू
मुखेड तालुक्यात पाच ते सहा गावांना पुराचा वेढा बसला आहे. जोरदार पावसामुळे अनेक जनावर दगावली, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ४० ते ५० म्हशींचा मृत्यू झाला आहे. रावणगाव येथे एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी पोहोचली आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.
महामार्गावर अपघात
तामसा ते हिमायतनगर या महामार्गावरील आष्टी गावाजवळ काही महिन्यापूर्वी मोठ्या पुलाच्या बाजूला छोटा पूल उभारण्यात आला होता. तीन दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पुरामुळे हा पूल दोन दिवसांपूर्वी खचला आहे.त्यामुळे महामार्गावर जात असताना दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यासोबत असलेल्या लहानमुलाला दुखापत झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.