Maharashtra Politics Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Nanded News: नांदेडमध्ये भाजपला धक्का! माजी मंत्री सूर्यकांता पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर? आज पक्षप्रवेश होण्याची शक्यता

Maharashtra Politics Breaking News: सूर्यकांता पाटील या भाजपमध्ये येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच कार्यरत होत्या. शरद पवार यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले. 10 वर्षांपूर्वी त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्या पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परत येण्याची शक्यता आहे.

Gangappa Pujari

संजय सूर्यवंशी, नांदेड|ता. २४ जून २०२४

नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर आज सुर्यकांता पाटील या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

सुर्यकांता पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर?

भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील या शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज मुंबई येथे सुर्यकांता पाटील यांचा पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी सुर्यकांता पाटील यांनी भाजपा पक्ष सस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला होता.

नांदेड जिल्ह्यात भाजपला भगदाड?

नांदेड जिल्ह्यात सुर्यकांता पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. मागील 10 वर्षांपासून सुर्यकांता पाटील ह्या भाजपामध्ये काम करीत होत्या. भाजपाने पाटील यांना कुठलेही जवाबदारी दिली नव्हती. त्यामुळेच सुर्यकांता पाटील ह्या भाजपा पक्षावर नाराज होत्या.

१० वर्षांनंतर स्वगृही परतणार?

दरम्यान, सूर्यकांता पाटील या भाजपमध्ये येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच कार्यरत होत्या. शरद पवार यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले. त्यांच्या त्यांच्या कामाची पावती म्हणून शरद पवार यांनी पाटील यांना केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री पदी संधी देण्यात दिली होती.

परंतु 10 वर्षांपूर्वी भाजपाची केंद्रात सत्ता आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत सूर्यकांता पाटील यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्या पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परत येण्याची शक्यता आहे. सूर्यकांता पाटील यांच्या राजीनाम्याने नांदेड जिल्ह्यात भाजपाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sant Dnyaneshwar Maharaj: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी भक्ताकडून चांदीची राखी अर्पण

Maharashtra Live News Update: काजू बागेत काम करणाऱ्या शेतकऱ्याचा हत्तीने केला पाठलाग

Supari Pan Uses : सुपारीच्या पानांचे हे ७ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीयेत का?

Maharashtra Politics : शिंदेसेनेच्या महिला शाखाप्रमुखाची तक्रार, ठाकरे गटातील आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल

लहान पोरांचं भांडण, आजोबांचाच जीव गेला; रस्त्यावर रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT