Nanded shocker: Congress–Vanchit alliance collapses within eight days over seat-sharing dispute. Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आघाडीची थाटात घोषणा पण आठ दिवसातच काडीमोड; वंचित-काँग्रेसचं काही जमेना

Nanded Politics: नांदेड नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी युती ८ दिवसांतच तुटली. काँग्रेसने अपेक्षित जागा न दिल्याचा आरोप वंचित यांनी केलाय. नांदेडमध्ये सर्वात आधी काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली होती.

Bharat Jadhav

  • काँग्रेस-वंचित युती आठ दिवसात तुटली.

  • नांदेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी झाली होती युती

  • काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का

मनसेला मविआमध्ये घ्यायचं की नाही याबाबत तळामळात असतानाच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. इकडे मनसेसोबत आघाडीची चर्चा होत नाही तोच काँग्रेसनं नांदेडमध्ये आपला मित्र गमवलाय. नांदेडमधील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी झालेली काँगेस आणि वंचितची युती अवघ्या आठ दिवसात तुटलीय. आठवडाभराच्या आतच युती तुटल्याची घोषणा वंचितने केलीय. अपेक्षित जागा न दिल्याने काँग्रेस सोबतची युती सोडत असल्याचे वंचितनं सांगितलं.

नगरपालिका निवडणुकांसाठी वंचित आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि वंचितच्या युतीचा संसार तुटला. समान जागा वाटपाचे धोरण ठरले होते. मात्र १३ नगर परिषदेत पावणे तीनशे जागांपैकी काँग्रेसने फक्त चार जागा दिल्या. तर आमची किमान २५ जागांची मागणी होती, असे वंचितने युती तोडताना स्पष्ट केलं.

काँग्रेसने आम्हाला चार जागा देऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला,असाही आरोप वंचितचे निवडणूक समन्वयक अविनाश भोसीकर यांनी केलाय. नांदेडचे काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षासाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नांदेडची काँग्रेस ही भाजपाची बी टीम, वंचितचा गंभीर आरोप केलाय.

भाजपा नेते अशोक चव्हाण यांना फायदा व्हावा म्हणून काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी कमी जागा देत वंचित सोबतची युती तोडली, असा आरोप वंचितकडून करण्यात आलीय. नांदेडची काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचे अविनाश भोसीकर म्हणाले. विशेष म्हणजे राज्यात सर्वप्रथम नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Latur Accident : लातूरमध्ये कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, ४ जण जखमी

Success Story: ४० लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली, आधी IPS नंतर IAS; UPSC परीक्षेत पहिले आलेले आदित्य श्रीवात्सव कोण?

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

SCROLL FOR NEXT