Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : डी मार्टमधून खरेदी केलेल्या शेव पाकिटात अळ्या; नांदेडमधील धक्कादायक प्रकार, जुलैपर्यंत होती एक्सपायरी डेट

Nanded : नांदेडमध्ये शेवच्या पाकिटात अळ्या निघाल्याने खळबळ उडाली आहे. अर्थात नावाजलेल्या कंपनीच्या बंद पाकिटांवर देखील विश्वास ठेवायचा कसा? हा प्रश्न निर्माण होत आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : शेवच्या बंद पाकिटांमध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. नांदेडमधील डीमार्ट मधून खरेदी केलेल्या हल्दीराम कंपनीच्या शेव पाकिटात अळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे या पाकिटांवर असलेली एक्सपायरी डेट हि जुलै २०२५ पर्यंतची लिहिण्यात आलेली होती. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.  

शहरामध्ये असलेल्या मोठ्या मॉलमध्ये जाऊन ग्राहक साहित्य खरेदी करत असतात. प्रामुख्याने बहुतांश शहरांमध्ये पोहचलेल्या डीमार्ट आहे. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी संख्या असते. येथे विक्रीसाठी असलेला माल चांगला असा विश्वास ठेवून ग्राहक खरेदी करत असतो. मात्र नांदेडमध्ये शेवच्या पाकिटात अळ्या निघाल्याने खळबळ उडाली आहे. अर्थात नावाजलेल्या कंपनीच्या बंद पाकिटांवर देखील विश्वास ठेवायचा कसा? हा प्रश्न निर्माण होत आहे. 

खाण्यासाठी पाकीट फोडले असता निघाल्या अळ्या 

दरम्यान धनंजय सूर्यवंशी यांनी नांदेड शहरातील डी मार्ट मधून काही सामान खरेदी केले होते. त्यामध्ये हल्दीरामचे प्रॉडक्ट असलेल्या भुजिया सेवचे पाकीट देखील खरेदी केले होते. घरी जाऊन खाण्यासाठी शेवचे हे पाकीट फोडून पाहिल्यानंतर त्यात अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार त्यांना लक्षात आला. त्यानंतर त्यांनी डी मार्टमध्ये जाऊन या प्रकाराबाबत माहिती देत या संदर्भात चौकशी केली. 

दुसऱ्या पाकिटांमध्येही अळ्या 

हा प्रकार लक्षात आणून देण्यासाठी धनंजय सूर्यवंशी हे दि मार्टमध्ये गेले. यानंतर येथील दुसरे पाकीट देखील फोडून पाहिले असता या पॉकेटमध्ये सुद्धा अळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व पाकिटांवर जुलै २०२५ हि एक्सपायरी डेट छापलेली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची खेळ सुरू असल्याचा प्रकार पुढे आल्याने कारवाई करावी; अशी मागणी धनंजय सूर्यवंशी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

SCROLL FOR NEXT