Youths Died After Drowning In Well Saam Tv
महाराष्ट्र

Nanded News: दुर्दैवी घटना! पोहायला गेलेल्या २ तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू, गावावर शोककळा

Two Youths Died After Drowning In Well: नांदेडमध्ये दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. बेटसांगवी गावात ही घटना घडलेली आहे.

Rohini Gudaghe

सुरज सुर्यवंशी, साम टीव्ही नांदेड

नांदेडच्या लोहा तालुक्यातील बेटसांगवी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे बेटसांगवी गावावर मोठी शोककळा पसरली आहे. बेटसांगवी येथील संतोष वानखेडे आणि राजेश वानखेडे, असं या मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. दोन तरूणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, काल दुपारी (९ जून) संतोष आणि राजेश हे त्यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले (Nanded News) होते. पोहताना या दोन्हीही तरुणांनी विहिरीत उडी घेतली. परंतु त्यांना विहिरीतील पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन्ही तरुणांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या तरुणांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला (Youths Died After Drowning In Well) आहे.

मुंबईतील घटना

मुंबई उपनगरात काल मुसळधार पावसात एका निर्माणाधीन इमारतीच्या साइटवरील काही भाग कोसळला. त्यामुळे इमारतीचा सुरक्षारक्षक आणि त्याच्या मुलाचा या घटनेत मृत्यू झालाय. रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. नागेश रेड्डी आणि रोहित रेड्डी असं या वडिल आणि मुलाचं नाव आहे. त्यांच्यावर अचानक या इमारतीचा काही स्लॅब आणि लोखंडे डाटा थेट (Accident) कोसळला.

त्यामुळे या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना ढिगाऱ्याबाहेर (Two Youths Died) काढलं. रुग्णालयात दाखल केलं परंतु त्यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केलंय. मुंबईत काल रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात घडल्याचं समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली

Cabinet expansion : शिंदे गटाला दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना संधी?

Vegetable Juice For Glowing Skin: चमकदार त्वचेसाठी दररोज प्या हिरव्या भाज्यांचे ज्यूस, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

Sanitation Workers : ९ वर्षात गटार साफ करताना ६२२ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

Jasprit Bumrah: BCCI मुळे जसप्रीत बुमराहचं २ कोटींचं नुकसान

SCROLL FOR NEXT