Nanded News Three School Student drown lake biloli taluka shocking incident Saam TV
महाराष्ट्र

Nanded News: तलावावर फिरायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले; दोन सख्ख्या भावंडांसह तिघांचा मृत्यू

Nanded News Today: राज्यात एकीकडे गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना, दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे.

Satish Daud

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

Nanded Latest News

राज्यात एकीकडे गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना, दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बामणी गावात एका पाझर तलावात बुडून ३ शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. तर गोदावरी नदीपात्रातील पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२८ सप्टेंबर) घडली आहे. (Latest Marathi News)

देवानंद पिराजी गायकवाड (वय १५ वर्ष), बालाजी पिराजी गायकवाड (वय १२ वर्ष) व वैभव पंढरी दुधारे (वय १५ वर्ष, सर्व रा. बामणी) असे मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. तसेच नांदेड शहरात (Nanded News) गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

परंतु या तरूणाचे नाव मात्र अद्याप समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बामणी गावात राहणारे देवानंद, बालाजी आणि वैभव हे तीनही शाळकरी मुले गुरुवारी पोहण्यासाठी पाझर तलावाकडे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

देवानंद व बालाजी हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तर वैभव हा आई वडिलांना एकटाच होता. दरम्यान, मुले पाण्यात बुडाल्याची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली. शोधाशोध घेतल्यानंतर तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

बिलोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेशराव सोंडारे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, बीट जमादार प्रभाकर गुडमलवार यांनी घटना स्थळावर जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. ऐन गणेश विसर्जनाच्या धामधुमीत गावातील तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने बामणी गावावर शोककळा पसरली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

SCROLL FOR NEXT