Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : नांदेडमध्ये तीन कारच्या काचा फोडल्या; महिनाभरातील तिसरी घटना

Nanded News : नांदेड शहरात पंधरा दिवसांपूर्वीच आनंद नगर भागात ८ वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी हनुमानगड भागात वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड शहरात गाड्या फोडण्याचे लोन वाढत असल्याचे दिसत आहे. सोमवारी रात्री पुन्हा एकदा शहरातील (Nanded) यशवंतनगर भागात ३ कारच्या काचा फोडण्यात आल्या प्रकार समोर आला आहे. या वाढत्या प्रकारांमुळे गाड्या आता कुठे उभ्या करायच्या हा प्रश्न आता निर्माण होत आहे. (Maharashtra News)

नांदेड शहरात पंधरा दिवसांपूर्वीच आनंद नगर भागात ८ वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी हनुमानगड भागात वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. यानंतर आता सोमवारी देखील हा प्रकार घडला आहे. गाड्या फोडण्याच्या सत्रामुळे नागरिकांत दहशत असून पोलिसांनी (Police) त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काचा फोडणारे सीसीटीव्हीत कैद 

घरासमोर रस्त्यावर या कार पार्क करण्यात आलेल्या होत्या. यात काही व्यक्ती येऊन त्यांनी गाड्यांच्या काचा फोडल्या. एका सीसीटिव्ही कॅमेऱ्यात काचा फोडणारा कैद झाला आहे. मात्र घरासमोर लावलेल्या वाहनाचे नुकसान होत असल्याने गाड्या कुठे लावाव्या असा प्रश्न नागरिकांडून उपस्थित केला जात आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT