Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : ६ लाखांची लाच घेताना बांधकाम अभियंता रंगेहाथ पकडला; घराची झडती घेताच अधिकारीही चक्रावले

Nanded News : अधिक्षक अभियंत्याने घेतली सहा लाखाची लाच; एसीबीने रंगेहाथ पकडले

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: नांदेडमधील सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंत्याने निविदा मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून सहा लाख रुपयांची (Bribe) लाच घेतली. हि रक्कम स्वीकारताना एसीबीच्या (Nanded) पथकाने अधीक्षक अभियंत्यासह लिपिकास ताब्यात घेतले आहे. हि कारवाई बुधवारी रात्री उशिरा झाली. (Latest Marathi News)

नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत आणि लिपिक विनोद कंधारे यांना सहा लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रात्री उशिरा ही कारवाई केली. बांधकाम विभागाकडून काढण्यात आलेली १४ कोटी १० लाखाच्या कामाची निविदा मंजूर करण्यासाठी गजेंद्र राजपूत यांनी कंत्राटदाराला सात लाखाची मागणी केली. तडजोडीअंती सहा लाख रूपये घेण्यास त्यांनी मान्य केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरात आढळले ७२ लाख 

दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंडळातील लिपिक विनोद कंधारे यांच्या मार्फत सहा लाख घेतांना एसीबीच्या पथकाने दोघांना अटक केली. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्ररकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री एसीबीने गजेंद्र राजपूत यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा पथकाला ७२ लाख रूपये रोख आढळले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT