Suicide Case Saam tv
महाराष्ट्र

अभियांत्रिकी विद्यार्थींनीची वसतीगृहातच आत्महत्या; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

अभियांत्रिकी विद्यार्थींनीची वसतीगृहातच आत्महत्या; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

संतोष जोशी

नांदेड : नांदेड येथील एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थींनीने आत्महत्या (Suicide) केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांना सुसाईड नोट असून कोणत्‍या कारणाने तिने आत्‍महत्‍या केली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून (Police) तपास सुरू असून अद्याप गुन्हा दाखल नाही. (Nanded News Suicide Case)

नांदेडमध्ये (Nanded) अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गिता कदम असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थींनीचे नाव आहे. एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकेच्‍या दुसऱ्या वर्षात शिक्षण (Education) घेणाऱ्या गिता कदम हिने प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मोबाईल, सुसाईड नोट जप्‍त

गिता ही उस्मानाबाद जिल्ह्य़ातील रहिवासी आहे. गिताने वसतीगृहातच आत्महत्या केली आहे. तिच्याजवळ पोलिसांना एक सुसाइड नोट (Suicide Note) सापडली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळावरुन सुसाइड नोट, मोबाइल जप्त केले आहे. या प्रकरणात अद्याप पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नसून, या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; कायदेंकडून पदाचा तडकाफडकी राजीनामा

इंजेक्शन लावून सफरचंद विक्रीचा आरोप, चौकशीत निर्दोष सापडला; आता विक्रेत्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

Maharashtra Live News Update: जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न - सुनेत्रा पवार

8 व्या वेतन आयोगाआधी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, होळीच्या आधी गुड न्यूज

ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT