Balaji Kalyankar
Balaji Kalyankar Saam tv
महाराष्ट्र

आमदार बालाजी कल्याणकरांना शिवसेनेकडून व्हिप; पक्ष प्रमुखांच्‍या बैठकीला हजर राहण्याचे आदेश

संतोष जोशी

नांदेड : नांदेडमध्ये बंडखोरीच्या तयारीत असलेल्या आणि सध्या गुवाहाटी येथे एकनाथ शिंदेच्या गटात असलेले नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवसेना पक्षाकडून व्हिप बजावण्यात आली आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते सुनिल प्रभु यांनी ही व्हिप पाठवली आहे. (nanded news shiv sena whips MLA Balaji Kalyankar Order to attend the meeting)

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. राज्‍यातील राजकारण देखील ढवळून गेले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्‍या काही आमदारांनी देखील बंडखोरी केली असून यात नांदेड (Nanded) उत्‍तरच आमदार बालाजी कल्‍याणकर हे देखील आहेत. यामुळे त्‍यांना पक्षाकडून व्‍हीप बजाविली आहे.

बैठकीला उपस्थित राहण्याबाबत व्‍हीप

नांदेडचे शिवसेनेचे दत्ता कोकाटे, उमेश मुंडे आणि आनंदा बोंढारे अशा तीनही जिल्हा प्रमुखांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयात जाऊन व्हिप बजावली आहे. सायंकाळी पाच वाजता शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे शिवसेना आमदारांची बैठक घेत आहेत. बैठकीला प्रत्यक्ष हजर रहावे अन्यथा ऑनलाईन बैठकीला उपस्थित रहावे; अशा पध्दतीचे व्हिप आहे. दरम्यान, जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे यांनी बालाजी कल्याणकर यांच्या पत्नीशी फोनवरुन चर्चा केली असता त्यांना जबरदस्तीने घेऊन गेले आहेत असे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT