Nanded Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Nanded Water Crisis : विहीर, पाझर तलाव आटले; नांदेड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईच्या झळा

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड लोहा या तालुक्यात अनेक वाडी तांड्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
:राज्यात पाणी टंचाईची समस्या अधिकच बिकट होत चालली आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात भीषण टंचाई जाणवत असून नांदेड जिल्ह्यात देखील दुष्काळ परिस्थिती अधिक गडद बनली आहे. उन्हाळा अधिक तीव्र असल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील पाझर तलाव, विहिरी आटल्याने पाणी मिळणे आता कठीण झाले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कंधार, मुखेड लोहा या तालुक्यात अनेक वाडी तांड्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यात कंधार तालुक्यातील आनंद वाडी या गावातील रहिवाशी हंडा भर पाण्यासाठी मैलो मैल दूर भटकंती करत आहेत. तीन ते चार किलो मीटर दूरवरून आनंद वाडी गावातील लहान मुले, महिला पाण्यासाठी कडक उन्हात पायपीट करीत आहेत. चार किलो मीटर दूर असलेल्या विहिरीत जीव धोक्यात घालून पाणी काढावं लागत आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात या गावाला भीषण पाणी टंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाझर तलाव आणि विहीर पूर्णतः आटल्या आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात; असे आदेश दिले असले तरी अद्याप नांदेड जिल्हा प्रशासन या गावांपर्यंत पोहचले नाही. शासनाने पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT