Nanded Kandhar Taluka News Saam TV
महाराष्ट्र

Nanded News: धावत्या बसचा अचानक दरवाजा उघडला अन् अनर्थ घडला; सासुरवाडीला जाण्याआधीच जावयाचा मृत्यू

Kandhar Taluka News: मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गायकवाड हे अंबुलगा येथे आपल्या साडूभाऊला भेटून परत सावरगाव येथे सासुरवाडीला जात होते.

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

Nanded Kandhar Taluka News: नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या धावत्या बसचा अचानक दरवाजा उघडला गेला. काही कळण्याच्या आतच दरवाजाजवळ उभा असलेला प्रवाशी थेट रस्त्यावर पडला. या घटनेत प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

अंगावर काटा आणणारी ही घटना शेल्लाळी फाटा (Nanded News) येथे रविवारी (१८ जून) रोजी सकाळच्या सुमारास घडली. लक्ष्मण शेषेराव गायकवाड (वय ४० वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनं पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या भोगळ कारभाराचा मुद्दा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गायकवाड हे अंबुलगा (Bus Accident) येथे आपल्या साडूभाऊला भेटून परत सावरगाव येथे सासुरवाडीला जात होते. मुखेड आगाराची कंधारहून मुखेडकडे जाणाऱ्या बसने ते प्रवास करत होते. बसमध्ये प्रवाश्यांची गर्दी होती.

दरम्यान, आंबुलागा गावाच्या पुढे ते सावरगावपर्यंत रस्त्याचं काम रखडलं आहे. त्यामुळे रस्ता अतिशय खराब आहे. तो रस्ता सुरू झाला की चढ आणि घाट वळण रस्त्यांवर शेल्लाळी पाटीच्या जवळ धावत्या एसटीचा दरवाजा उघडला.

काही कळण्याच्या आतच गायकवाड बसमधून खाली कोसळले. यानंतर बसचं पाठीमागील चाक त्यांच्या अंगावरून गेलं. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: ICU मध्ये बेड नाही, स्ट्रेचरवरच उपचार; कूपर रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये उन्हाचा चटका वाढताच रस्त्यावर शुकशुकाट

BJP: माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, तेव्हाच पद मिळेल; महिला पदाधिकाऱ्याचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली, वाटेत दोघांनी अडवलं; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार

Auto Driver Marathi language : हिंदीसक्तीचा बदला घेण्यासाठी शिंदेसेनेची मराठीसक्ती? EXPLAINER

SCROLL FOR NEXT