Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : डांबरीकरण झालेला रस्ता चक्क हाताने उखडला; लोहा तालुक्यात निकृष्ट दर्जाचे काम

Nanded News : टाकळगाव ते बोरगावला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर झाले होते. त्यानुसार कामाला सुरवात करत काही दिवसापूर्वीच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: एकीकडे सिमेंटचे दर्जेदार रस्ते होत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. लोहा तालुक्यातील टाकळगाव येथे डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले असून दोन दिवसापूर्वी झालेला डांबरीकरण रस्त्या एका गावाकऱ्याने चक्क हाताने उखडला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

नांदेडच्या लोहा तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील टाकळगाव ते बोरगावला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर झाले होते. त्यानुसार कामाला सुरवात करत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. डांबरीकरण रस्ता काही दिवसापूर्वीच तयार करण्यात आला होता. मात्र संबंधित कंत्राटदाराने तयार केलेला हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. काही दिवसातच हाताने हे डांबर निघत आहे. 

हाताने निघतेय डांबर 

या डांबरीकरण रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे. सत्यम लामदाडे या तरुणाने हा डांबरीकरण केलेला रस्ता चक्क हाताने उकरून दाखवला होता. या प्रकारामुळे संबंधित रस्ता तयार करणाऱ्या गुत्तेदाराचे पितळ उघडं पडलं आहे. अर्थात काही दिवसातच या रस्त्यावर खड्डे पडण्याची शक्यता आहे. या रस्त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला असताना रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे. 

ठेकेदारावर कारवाईची मागणी 

दरम्यान हाताने डांबर उखडत असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या रस्त्याची चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर कारवाई करावी आणि रस्ता दर्जेदार करून देण्याची मागणी; आता गावकरी करीत आहेत. यामुळे प्रशासनाकडून आता काय भूमिका घेण्यात येते; हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीवरून नवा वाद

Nashik : नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय? १९ वर्षाच्या तरूणीची २ लाखांत विक्री, जबरदस्तीने लग्न लावले

HSRP Number Plate: अजूनही HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? रजिस्ट्रेशन कसं करायचं? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Holi 2026 : होळीला गोड खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा खानदेशी स्टाइल डुबुक वड्यांचा झणझणीत रस्सा

Israel Iran War : इस्रायल-इराण युद्धादरम्यान UAE मध्ये अडकली अक्षय कुमारची हिरोईन, पोस्ट करत म्हणाली- "भयानक परिस्थिती, मला घरी जायचे..."

SCROLL FOR NEXT