Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : पैनगंगा नदी कोरडी; इस्लापुर शहरासह १५ गावांना पाणी टंचाई

Nanded News : यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर देखील पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच पैनगंगा नदी कोरडी पडल्याने या भागातील नागरिकासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदी कोरडी पडली आहे. परिणामी या नदीमधून पुरवठा होणाऱ्या साधारण १५ गावांना आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तर इस्लापुर शहराजवळील सहस्त्रकुंडने देखील तळ गाठला असल्याने इस्लापुर शहरात देखील पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर देखील पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच पैनगंगा नदी कोरडी पडल्याने या भागातील नागरिकासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पैनगंगा नदी परिसरातील १५ ते १६ गावच्या नागरिकांनी पैनगंगा नदी पात्रामध्ये पाणी सोडावे यासाठी तब्बल सहा दिवस पैनगंगा नदी पात्रामध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. 

१५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा 

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर शहरासह १५ गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. इस्लापुर शहराजवळ असलेल्या सहस्रकुंडाने तळ गाठला असून यात केवळ पंधरा दिवस पुरेल येवढाच पाणीसाठा या कुंडात शिल्लक राहिल्याने इस्लापूर ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आगामी काळात हि भीषणता अधिक तीव्र होण्याची शक्यता वार्तिविली जात आहे. 

नदीत पाणी सोडण्यासाठी उपोषण 

दरम्यान नागरिकांनी उपोषण केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नदीपात्रात पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. मात्र अद्याप पर्यंत पैनगंगा नदी पात्रामध्ये इसापूर धरणाचे पाणी सहस्रकुंडपर्यंत आलेले नाही. त्यामुळे इस्लापुर शहरासह १५ गावात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT