Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : झाड कोसळून एकजण गंभीर जखमी, गाड्यांचे नुकसान; नांदेड शहरातील घटना

Nanded News : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. पाऊस सुरु असल्याने जमीन पूर्णपणे ओली असून झाडांच्या मुळा देखील आता ढिल्या झाल्या आहेत

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे नांदेड शहरातील श्रीनगर भागातील मुख्य रस्त्यावरील एक झाड अचानक रस्त्यावर उन्मळून पडले. रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीवर झालं पडल्याने दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली आहे. नागरिकांनी बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे. 

नांदेड (Nanded News) जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. पाऊस (Rain) सुरु असल्याने जमीन पूर्णपणे ओली असून झाडांच्या मुळा देखील आता ढिल्या झाल्या आहेत. यामुळे नांदेड शहराच्या श्रीनगर भागातील मुख्य रस्त्यावरील झाड सकाळी अचानक उन्मळून पडले. आज रविवार असल्याने रस्त्यावरून जास्त रहदारी नव्हती. मात्र झाड कोसळल्याने काही वेळ या झाडाखाली तिघे जण दबले गेले होते. स्थानिकांनी या तिघांना बाहेर काढले. 

रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी वर हे झाड कोसळले आहे.दुचाकीवर दुचाकी स्वरासह एक महिला आणि लहान मुलगा होता. यातील एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. झाड रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT