Wardha News : पुराच्या पाण्यात बोलेरो गेली वाहून, तिघे अडकले; रेस्क्यू करून तिघांना वाचवले

Wardha News : सकाळच्या सुमारास एक चारचाकी लाहोरी येथून समुद्रपूरकडे जात होती. या वाहनात तिन जण सवार होते. वाहन वाघोडी नाल्याच्या पुलाजवळ पोचताच वाहन पुराच्या पाण्यात वाहून पुरात अडकले.
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास 

वर्धा : वर्धा जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाल्याना पूर आला आहे. अश्यातच समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नाल्याला पूर आल्याने या नाल्याच्या पुलावरून लाहोरी येथे जातं असतांना बोलेरो वाहन पुरामध्ये अडकले. या वाहनातील तिघांनी बचावासाठी झाडाचा सहारा घेत पुरात अडकून राहिले. ही माहिती समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांना मिळताच त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने पुरातून तिघांचे प्राण वाचवले. 

Wardha News
Wardha News : पतीचा डोळ्यादेखत मृत्यू; शेतात गेले असता बसला विजेचा जोरदार झटका

या घटनेत विलास शहाणे, रामकिसन गौतम आणि हिरालाल बारेड या तिघांना रेस्क्यू करून वाचविण्यात आले आहे. दरम्यान (Wardha) सकाळच्या सुमारास एक चारचाकी लाहोरी येथून समुद्रपूरकडे जात होती. या वाहनात तिन जण सवार होते. वाहन वाघोडी नाल्याच्या पुलाजवळ पोचताच वाहन पुराच्या पाण्यात वाहून पुरात अडकले. दरम्यान अचानक पाण्याचा लोंढा आला असता वाहनातील तिघांनी आपले प्राण वाचविण्यासाठी एका झाडाचा आधार घेतला. या लोंढ्यात गाडी मात्र वाहून गेली आहे. वाघोडी नाल्याच्या पुरात तिघे अडकल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना (Police) मिळताच घटनास्थळ गाठले. 

Wardha News
Nalasopara News : तब्बल २५ महिलांशी लग्न करत पैसेही उकळले; अखेर सापडला पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. घटनास्थळी पाण्याची वाढती पातळी पाहता पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी स्वतः नागरिकांच्या मदतीने पुरात अडकलेल्याना काढण्याचा निर्णय घेतला. नागरिकांच्या मदतीने पोलीस निरीक्षकांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून तिघांचे प्राण वाचविले. तिघांना पोलिसांनी वाचविले असले तरी अद्याप वाहन हे पाण्यात अडकून आहे. या बचावकार्यत पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांना पोलिस उपनिरीक्षक देरकर, पोलिस उपनिरीक्षक टेम्भूर्णे, पोलिस कर्मचारी रोशण मडावी, होमगार्ड सागर वाटमोडे, निलेश नागपुरे, नितिन बावणे, सुधाकर झाडे, प्रकाश घाडे, ललित डगवार, हेमंत डगवार, बादल कापकर, अतुल वावधने, विलास बेलेकर, पंकज बेलेकर आदिंसह गावकऱ्यांनी सहकार्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com