Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : रस्त्याचे काम आडवत मायलेकाने घेतले विषारी औषध; राज्य महामार्गात १०० फूट जमीन जास्त घेतल्याचा आरोप

Nanded News : कंधार ते लोहा असा राज्य महामार्ग जात आहे. यात कंधार तालुक्यातील घोडज येथील इंदरबाई तेलंगे व व्यंकटी तेलंगे यांनी या कामावर हरकत घेऊन २०२२ व २०२४ साली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेडमधून लोहा ते कंधार या राज्य महामार्गाचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. या कामांसाठी शेतकऱ्यांच्या काही जमिनी रस्त्याच्या कामासाठी गेल्या आहेत. दरम्यान राज्य महामार्गात १०० फूट जमीन जास्त घेण्यात आल्याचा आरोप तेलंगे या शेतकरी परिवाराकडून करण्यात आला आहे. याबाबतच्या तक्रारीनंतर देखील रस्त्याचे काम सुरु असल्याने शेतकरी असलेल्या मायलेकाने रस्त्याचे काम अडवत विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

नांदेडच्या कंधार ते लोहा असा राज्य महामार्ग जात आहे. यात कंधार तालुक्यातील घोडज येथील इंदरबाई तेलंगे व व्यंकटी तेलंगे यांनी या कामावर हरकत घेऊन २०२२ व २०२४ साली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. रस्त्याच्या एकाच बाजूने १०० फूट जमीन घेतल्याचा आरोप तेलंगे कुटुंबियांचा आहे. या प्रकरणी प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करत दाद मागितली आहे.  

रस्त्याचे काम अडवत आत्महत्येचा प्रयत्न 

दरम्यान आता या रस्त्याचे काम घोडज गावाजवळ आल्यानंतर तेलंग कुटुंबियातील इंदरबाई तेलंगे व व्यंकटी तेलंगे यांनी विरोध करून विषारी औषधे आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ कंधार येथील रुग्णालयात हलवल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हालवण्यात आले आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुमित पाटील यांनी स्पष्टीकरण दिले असून रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूने 50 फूट जमीन घेतली आहे. 

रस्त्याच्या मधून भिंत बांधणे अशक्य 

तर घाट रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात त्यांच्या शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तुम्हाला भिंत बांधून देऊ असं आश्वासन देण्यात आले होते. मात्र ही भिंत बांधताना आमच्या शेतातील एक इंचही जमीन देणार नाही. सगळी भिंत रस्त्याच्या मधून बांधा असं तेलंग कुटुंबीयांनी सांगितल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुमित पाटील यांनी केला आहे. रस्त्याच्या मधून भिंत बांधणीचा रस्ता अरुंद होतो. त्यामुळे त्यांची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे अभियंता सुमित पाटील यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad Times Sign: वाईट काळ सुरू होण्याआधी मिळतात हे संकेत, वेळीच ओळखा

Akshay Kumar: 'गुटखा तोंडात दाबून...' पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: परभणीच्या गंगाखेड तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाचा मोर्चा

Skin Care Tips: महिलांनो, रात्री झोपण्यापूर्वी ही चूक तर करत नाही ना? अन्यथा...

Loni Police : पोलिसाकडून दुकानदाराला मारहाण; दुकान बंद करण्यावरून झाला वाद

SCROLL FOR NEXT