Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : धक्कादायक प्रकार; मनोरुग्ण मुलाला शेतातील झोपडीत ठेवले बांधून, ग्रामस्थांना त्रास देत असल्याने आईनेच घेतला निर्णय

Nanded News : गरीब परिस्थितीमुळे मनोरुग्ण मुलावर उपचार करणे शक्य नसल्याने आई हतबल झाली असून ग्रामस्थांना होत असलेला त्रास बंद व्हावा यासाठी पोटच्या मुलाला एकटे सोडत शेतातील झोपडीत बांधून ठेवले

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: गावात राहिल्यानंतर इकडे तिकडे फिरताना ग्रामस्थांना त्रास देणे, लहान मुलांना मारहाण करणे. तसेच गाडीच्या काचा फोडत असल्याने आपल्या पोटच्या मनोरुग्ण असलेल्या मुलाला शेतातील टिन शेडच्या झोपडीत बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या भोकर तालुक्यातील वाकद गावात समोर आला आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मुलावर उपचार करता येणे शक्य नसल्याने आई देखील हतबल झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील वाकद गावातील हा प्रकार असून पांडुरंग वागतकर असे मनोरुग्ण असलेल्या मुलाचे नाव आहे. पांडुरंग हा गावातील लहान मुलांना मारहाण करून गाड्यांच्या काचा फोडतो. म्हणून चक्क जन्मदात्या आईनेच त्याला शेतात टिन पत्राचे शेड करून बांधून ठेवले आहे. वृद्ध लक्ष्मीबाई वागतकर या रोज मनोरुग्ण मुलाला सकाळ, सायंकाळी चार किलोमीटर पायपीट करत जेवण नेऊन देत असते. 

सहा महिन्यांपासून ठेवलेय बांधून 

दरम्यान मनोरुग्ण पांडुरंग वागतकर याच्यावर नांदेड रुग्णालय व पुण्यात सुद्धा उपचार करण्यात आले आहेत. मात्र त्याच्यात कोणताही फरक पडल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर पांडुरंग वागतकर याचा गावात उपद्रव वाढल्याने शेवटी काळजावर दगड ठेवून जन्मदात्या आईनेच त्याला शेतात बांधून ठेवले आहे. गेल्या सहा महिन्यापासून हा मनोरुग्ण शेतात बांधून असल्याने त्याच्या शरीराला जखमा झाल्या आहेत. 

आईची प्रशासनाला हाक 

शेतात एकट्याला बांधून ठेवलेल्या पांडुरंग याची प्रशासनाने सुटका करून व्यवस्थित उपचार करावेत अशी मागणी त्याची आई लक्ष्मीबाई वागतकर यांनी केली आहे. तर गावचे सरपंच विकास वाकेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही; असं सांगत जिल्हाधिकारी व सामाजिक संस्थेने पुढाकार घ्यावा; अस आवाहन सरपंचांनी केल आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT