Nanded Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: तरुणीशी प्रेमसंंबंध, तिला हॉटेलात नेल्याचा राग; नातेवाइकांनी तरुणाला कायमचं संपवलं

तरुणीशी प्रेमसंबंध पडले महागात; लाठ्या काठ्यांनी मारहाण करत केला खून

संतोष जोशी

नांदेड : नांदेडमध्ये अन्‍य धर्माच्‍या तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याच्या रागातून एका तरुणाचा लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला करुन खुन (Crime News) करण्यात आला होता. जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या (Police) पथकाने तपास चक्रे फिरवत 48 तासांत स्वप्निल नागेश्वर याच्या मारेकऱ्यांना अटक केली. (Breaking Marathi News)

नांदेड (Nanded) शहरातील देगावचाळ परिसरात घरा शेजारी राहणाऱ्या एका तरुणीशी स्वप्निल नागेश्वर याचे प्रेमसंबंध होते. स्वप्निल हा या तरुणीला घेऊन एका हॉटेलमध्ये गेला होता. याचाच राग मनात धरुन तरूणीच्या नातेवाईकांनी मित्रांच्या सहकार्याने स्वप्निलला लिंगायत स्मशानभूमीजवळ नेऊन लाठ्या काठ्यानी मारहाण केली. यात त्‍या तरूणाचा मृत्‍यू झाला. या प्रकरणानंतर तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने आरोपींविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

सीसीटीव्‍हीच्‍या आधारे आरोपी अटकेत

मुख्य आरोपी शायजाद खान एजाज खान, महम्मद सद्दाम महम्मद कुरेशी, महम्मद उसामा महम्मद साजिद कुरेशी, शेख आयान शैख इमाम, सोहेल खान साहेब खान, सय्यद फरहान, उबेद खान युनूस खान या सात आरोपींना सिसीटीव्हीच्या आधार घेत अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Second heart attack risk: दुसऱ्यांदा हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात होऊ लागतात हे बदल, वेळीच लक्षणं ओळखा

Maharashtra Live News Update: आज अर्ध्या पुणे शहराची बत्ती होणार गुल, वीजपुरवठा राहणार बंद

बॉलिवूड हादरलं! फक्त रोहितचं नव्हे गँगस्टरच्या निशाण्यावर ५ मोठे सुपरस्टार्स; मुंबई पोलिसांचा धोक्याचा इशारा

Ration Card: टेन्शन देणार बातमी! या नागरिकांचे रेशन कार्ड कायमचे बंद; मिळणार नाही लाभ; तुमचंही नाव आहे का?

Health Care : दररोज बीट खाण्याचे फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT