Nanded Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Nanded Heavy Rain : नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचे थैमान; पाच तालुक्यात अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत

Nanded News : जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी काही रहदारीचे मार्ग देखील बंद झाले आहेत. नांदेड- हैद्राबाद महामार्गावरील पूल देखील पाण्याखाली गेला आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. यानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाने थैमान घातले आहे. रात्रीपासून नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. यात जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. 

नांदेड व वाशीम जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असताना नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी काही रहदारीचे मार्ग देखील बंद झाले आहेत. 

अनेक गावांचा संपर्क तुटला 

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्यांना मोठा पूर आला. नायगाव मुखेड, धर्माबाद, देगलूर, बिलोली या तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. नदी नाल्यांना मोठा पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क देखील तुटला आहे. शेतीचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. पुराचे पाणी नांदेड- हैदराबाद महामार्गावर आल्याने या महामार्गाला नदीचे स्वरूप आले आहे.

लेंडी धरणाचे सर्वच दरवाजे उघडले
काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. नांदेडसह लातूर आणि बिदर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे लेंडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने लेंडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणाच्या सर्वच दरवाज्यातून लेंडी नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लेंडी नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

Jio: धमाकेदार ऑफर, युजर्सला थेट ३५ हजाराचा फायदा, जिओची अनोखी स्किम

SCROLL FOR NEXT