Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : गणरायाच्या विसर्जनासाठी उतरले नदीत; पाय घसरल्याने तिघेजण गेले वाहून, एकाला वाचवण्यात यश

Nanded News : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..असे म्हणत लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. दहा दिवसांच्या उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देऊन करण्यात आला

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: दरवर्षी गणेश विसर्जनावेळी नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडत असतात. त्यानुसार यंदाच्या विसर्जनावेळी देखील राज्यात अनेक ठिकाणी नदीत बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. नांदेड शहरातील गणेश विसर्जनासाठी तिघेजण नदीत उतरले होते. यावेळी पाय घसरल्याने ते तिघेही नदीत वाहून गेले होते. दरम्यान यातील एकाला वाचविण्यात यश मिळाले आहे. 

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..असे म्हणत लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. दहा दिवसांच्या उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देऊन करण्यात आला. दरम्यान काही ठिकाणी गणपती विसर्जित करताना दुर्दैवी घटना घडल्या असून नांदेड जिल्ह्यात देखील अशीच घटना समोर आली असून यात नदीत वाहून गेलेले दोघेजण बेपत्ता आहेत. 

दोघेजण बुडाले, एकाला वाचविण्यात यश 

नांदेड शहरात गणेश विसर्जन सुरळीत सुरु असताना शहरालगत असलेल्या गाडेगाव परिसरात एक दुर्देवी घटना घडली. गावातील गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तिघेजण पाण्यात उतरले होते. यात तिघांचा पाय घसरल्याने ते पाण्यात बुडाले. यातील दोन तरुण नदीत बुडाले. तर अन्य एकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं आहे. शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास गाडेगाव आसना नदी येथे ही दुर्देवी घटना घडली. 

दोघांचा शोध सुरूच 

तर घटनेला अनेक तास उलटून देखील एसडीआरएफ पथकाकडून बुडालेल्या दोघांचा शोध सुरूच आहे. बालाजी कैलास उबाळे (वय १८) आणि योगेश गोविंद उबाळे (वय १७) अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावं असून दोघे गाडेगाव येथील रहिवासी आहेत. या घटनेने दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Bengal Files OTT Release : थिएटरनंतर पल्लवी जोशीचा 'द बंगाल फाइल्स' ओटीटीवर कधी येणार? वाचा अपडेट

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Jamner Accident : भरधाव डंपरने तरुणाला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा मृतदेहासह रास्ता रोको

Ashwini Kedari: PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण अश्विनी केदारींवर काळाचा घाला, अवघ्या ३०व्या वर्षी मृत्यू

सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होणार? कारणही आले समोर आले

SCROLL FOR NEXT