Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत फसवणूक; सीएससी केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
 : लाडकी बहीण योजना अनेक कारणाने चर्चेत असते. अनेक ठिकाणी या योजनेत फसवणूक झाल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. अशाच प्रकारे सीएससी केंद्र चालकाने लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यावर जमा केल्याचा प्रकार नांदेड समोर आला असून या प्रकरणी केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेडच्या (Nanded News) हदगाव तालुक्यातील मनाठा येथे हा प्रकार घडला होता. लाडक्या बहिणीचे जमा झालेले पैसे त्यांच्या पतीच्या खात्यावर सीएससी केंद्र चालकाने जमा करून घेतले. रोजगार हमी योजना आणि इतर योजनेचे पैसे तुमच्या नावावर जमा झाले, असे या लाडक्या बहिणीच्या पतीला केंद्र चालकाने भासवल आणि त्यांच्याकडून आधार कार्ड आणि बँक पासबुक मागवून घेतले. पुन्हा हेच पैसे सीएससी केंद्र चालकांनी आपल्या (Fraud) खात्यावर जमा करून घेतले. हा सगळा प्रकार आता उघड झालाय. 

सदर प्रकार समोर आल्यानंतर सीएससी केंद्र चालक सचिन थोरात कालपासून गावातून पसार झाला आहे. लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्या सीएससी केंद्र चालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. मंडळ अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास ७१ जणांना सीएससी केंद्र चालकाने गंडा घातल्याचे समोर आले आहे. योजनेत फसवणूक करणाऱ्या १६ लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: निलेश राणे करणार शिवसेनेत प्रवेश? एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

Bhokardan Vidhan Sabha : मविआत रस्सीखेच; शिवसेना ठाकरे गटाने ठोकला दावा

Arti Sarin : आरती सरीन बनल्या AFMS च्या पहिल्या महिला महानिर्देशक; कोण आहेत आरती सरीन? वाचा सविस्तर

Honey Benefits: कॉफित मध मिसळून रिकाम्या पोटी प्या अन् मिळवा अनेक फायदे

Thane Breaking : ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये अग्नितांडव; 2 गॅस सिलेंडरचा स्पोट

SCROLL FOR NEXT