Nanded News saam tv
महाराष्ट्र

Nanded : हदगाव तहसील कार्यालयात फोडले फटाके; प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी रास्ता रोको

Nanded News : अमरावती येथे शेतकऱ्याच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. मागील सहा दिवसांपासून आंदोलन सुरु असून आंदोलनाची अद्याप सरकारकडून दखल घेण्यात आलेली नाही

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 

नांदेड : बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान हदगाव शहर बंद ठेवले होते. हदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसील कार्यालयात फटाके फोडून आंदोलन केले. याशिवाय वर्धा, सटाणा येथे देखील आंदोलन करण्यात आले आहे. 

अमरावती येथे शेतकऱ्याच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. मागील सहा दिवसांपासून आंदोलन सुरु असून आंदोलनाची अद्याप सरकारकडून दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे प्रहार संघटनेचे पदाधिकारी आक्रमक होऊन ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी हदगाव तहसील कार्यालयाच्या आवारात फटाके फोडून प्रशासनाला जागी करण्याचा प्रयत्न केला. तर बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सटाण्यात रास्ता रोको आंदोलन
सटाणा (नाशिक)
: प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विंचूर- प्रकाशा महामार्गावरील नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ढोलबारे येथे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे दिड तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात वाहतूक सुरळीत केली.

मानोरा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
मानोर (वाशीम) : प्रहारचे बच्चू कडू यांच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीला घेऊन मागील सहा दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ वाशिममध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. मानोरा तहसील कार्यालयाच्या आतमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे ठिय्या आंदोलन सुरू केले. 

वीरूळ येथे रास्ता रोको 
वर्धा
: प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून वर्ध्याच्या वीरूळ येथे रस्त्यावर उतरत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केले. बच्चू कडू यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन केले. रस्ता रोको आंदोलनमुळे पुलगाव- आर्वी मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्या, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान रस्ता रोको करणाऱ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT