Lightning Strike : पाच मिनिटाच्या अंतरावर घर असताना काळाची झडप; वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

Sangli Miraj News : सायंकाळी विजेच्या कडकडाटसह वादळी पावसाची सुरुवात झाली. पाऊस सुरु झाल्याने सर्व शेतकरी व मजूर घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यानुसार सागर गुंडवाले हे देखील वैरण घेऊन घरी जात होते
Lightning Strike
Lightning StrikeSaam tv
Published On

सांगली : राज्यातील अनेक भागात आता मान्सूनचे आगमन होत आहे. मान्सूनचा पहिला पाऊस असल्याने वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. अशात सांगली जिल्ह्यात देखील पावसाचे आगमन झाले असून मिरज तालुक्यातील ढवळी येते शेतातून वैरण घेऊन येत असताना अंगावर वीज कोसळून शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मिरज तालुक्यातील ढवळी येथील सागर जिनाप्पा गुंडवाडे (वय ३७) असे मृत झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. म्हैसाळ रस्ता गुंडवडे मळा शेतातून येत असताना घटना घडली आहे. सायंकाळी विजेच्या कडकडाटसह वादळी पावसाची सुरुवात झाली. पाऊस सुरु झाल्याने शेतात गेलेले सर्व शेतकरी व मजूर घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यानुसार सागर गुंडवाले हे देखील वैरण घेऊन घरी जात होते. 

Lightning Strike
Mokhada : काळजावर दगड ठेवून मृत अर्भक पिशवीत टाकले; ९० किलोमीटरचा प्रवास करत आले गावी, रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातच मृत्यू

काही अंतरावरच होते घर

मयत सागर गुंडवाडे हे शेतातून जनावरांना वैरण घेऊन अर्धा किलोमिटर अंतरावर असलेल्या त्यांच्या घराकडे जात होते. शेतातून डांबरी रस्त्यावर आल्यानंतर अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाले. यावेळी शेतालगत असलेल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या सदर घटना लक्षात आली. यानंतर तात्काळ उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच सागर याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

Lightning Strike
Solapur Accident : भरधाव ट्रकची मिनी ट्रकला जोरदार धडक; एकाचा मृत्यू, १५ जखमी

कुटुंबाचा आधार गेला 

सागर यांच्या डोक्यावरच वीज कोसळल्याने त्यांच्या डोक्याची केस जळून शरीर पूर्ण काळे पडले होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने शासनाने त्याच्या कुटुंबाला मदत करावी अशी गावातील नागरिकांनी मागणी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com