Mokhada : काळजावर दगड ठेवून मृत अर्भक पिशवीत टाकले; ९० किलोमीटरचा प्रवास करत आले गावी, रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातच मृत्यू

Palghar Mokhada news : रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सकाळी ८ वाजता पुन्हा एकदा काॅल केले. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत वाट पाहून सुध्दा रूग्णवाहीका उपलब्ध न झाल्याने खाजगी वाहनाने खोडाला रूग्णालयात दाखल करण्यात आले
Palghar Mokhada news
Palghar Mokhada newsSaam tv
Published On

फैय्याज शेख 

मोखाडा (पालघर) : जव्हार मोखाडा तालुक्यातील आरोग्य सेवेची असलेली समस्या संपत संपत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. रुग्णवाहिका मिळत नाही तर कधी डॉक्टर नसल्याने वेळेत उपचार घेता येत नाही. यामुळे जव्हार मोखाडा तालुक्यातील बाळ व माता मृत्यूचे थैमान थांबता थांबेना. यात पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली असून वेळेत रूग्णवाहिका न मिळाल्याने बाळाचा पोटात मृत्यू झाला आणि काळजावर दगड ठेवून मृत अर्भक पिशवीत टाकून बाप गावी परतला. 

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जोगलवाडी येथील गर्भवती महिला अविता सखाराम कवर (वय २६) हीला रात्री तीन वाजेच्या सुमारास पोटात कळा येवू लागल्या. यामुळे तिला रुग्णालयात नेण्यासाठी १०८ या क्रमांकावर काॅल केले. परंतु रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सकाळी ८ वाजता पुन्हा एकदा काॅल केले. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत वाट पाहून सुध्दा रूग्णवाहीका उपलब्ध न झाल्याने अखेर एका खाजगी वाहनाने खोडाला रूग्णालयात दाखल करण्यात आले.  

Palghar Mokhada news
Air India Plane Crash: संतापजनक! विमान अपघातात रक्ताळलेलं स्त्रीचं शीर रस्त्यावर पडलं, बघ्यांनी सेल्फी काढली

बाळाचा पोटातच मृत्यू 

खोडाला रुग्णालयात उपचार शक्य नसल्याने तिला मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र रुग्णालयात देखील  रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आसे उपकेंद्रातून रुग्णवाहिका मागविण्यात आली. यानंतर संध्याकाळी ६ वाजता गरोदर महीलेला मोखाडा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणी दरम्यान बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले.

Palghar Mokhada news
Maval : बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन; मंगरुळ परिसरात मोठी कारवाई, पंचवीस वाहने जप्त

बापाचा काळजावर दगड 

नाशिक येथील रूग्णालयात शास्त्रक्रिया करत मातेला वाचविण्यात यश आले. मात्र या सर्व घटनेत मृत्यू अर्भकास घरी नेण्यासाठी देखील रूग्णवाहिका न दिल्याने मृत अर्भकास पिशवीत भरून तब्बल ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास बसने करत मृत अर्भकास बापाने गावी घेऊन येत दफनविधी केला. इतकेच नाही तर आरोग्य प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या बापाला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com