Maval : बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन; मंगरुळ परिसरात मोठी कारवाई, पंचवीस वाहने जप्त

Maval News : मावळच्या मंगरूळ परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरु होते. अर्थात महसूल विभागाकडे भरण्यात येत असलेली रॉयल्टी न भरताच अनधिकृतपणे गौण खनिज उत्खनन करण्यात येत होते
Maval News
Maval NewsSaam tv
Published On

मावळ : मावळ तालुक्यातील मंगरुळ येथे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी महसूल प्रशासनाने मोठी कारवाई  कारवाईत एकूण पंचवीस वाहने जप्त केली आहेत. तसेच या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान या कारवाईमुळे गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

मावळच्या मंगरूळ परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरु होते. अर्थात महसूल विभागाकडे भरण्यात येत असलेली रॉयल्टी न भरताच अनधिकृतपणे गौण खनिज उत्खनन करण्यात येत होते. याबाबत काही तक्रारी दाखल होत्या. तसेच  या प्रकरणात आमदार सुनील शेळके यांनी राज्य विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन आणि वृक्षतोड झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. 

Maval News
Ahilyanagar : हुंडा बंदीसाठी गावाची अनोखी बक्षीस योजना; सौंदाळा ग्रामसभेत आदर्श ठराव मंजूर

पोकलेन मशीनसह डंपर जप्त 

यासंदर्भात डिसेंबर २०२४ मध्ये अवैध वृक्षतोड व उत्खनन उघडकीस आले असून आठशे ते नऊशे झाडांची तोड व सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार ब्रास माती, मुरूम आणि डबरचे उत्खनन झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यात २५ वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात अकरा पोकलेन मशीन, मुरमाने भरलेले चार डंपर व रिकामे दहा डंपर यांचा समावेश आहे. 

Maval News
Murbad BJP : मुरबाडमध्ये भाजपला धक्का; ९ नगरसेवक फुटले, वेगळा गट स्थापन करत नगरपंचायतीत सत्तांतर

अहवाल आल्यानंतर दंडात्मक कारवाई 
दरम्यान गट क्रमांक ४१ व ४२ हे वनक्षेत्रात मोडत असूनही त्याठिकाणी उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर वन खात्याच्याही चौकशीला सुरुवात झाली आहे. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गौण खनिज उत्खननाबाबत येत्या तीन- चार दिवसांत सविस्तर अहवाल मिळणार असून त्यानंतर महसूल कायद्यानुसार तातडीने दंडात्मक कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com