Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : व्हिडीओ करत दिला इशारा, नुकसानग्रस्त शेतकऱ्याची नदीत उडी; पुराच्या पाण्यात उडी घेत गावकऱ्यांनी वाचविला जीव

Nanded News : नुकसानीची पाहणी कराय कोणीही आलं नाही, व्हिडिओच्या करून काल शेतकऱ्यांनी व्यथा मांडत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता, यानंतर आज नदीतील पुराच्या पाण्यात उडी घेतल्याने खळबळ उडाली

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 

नांदेड : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात गोदावरी नदीला मोठा पूर आल्याने नदीच्या पाण्याने देखील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने काल व्हिडीओ करत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर आज या शेतकऱ्याने गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र गावकर्यांनी प्रसंगावधान राखत या शेतकऱ्याचा जीव वाचविला आहे. 

गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे संतोष कदम असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील चुळाका शिवारात हि घटना घडली आहे. जोरदार पावसामुळे नांदेडमध्ये गोदावरीच्या महापुरात शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील चुळाका शिवारात संतोष कदम यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतीतील पिकात पुराचं पाणी अजूनही साचलेला आहे. यामुळे उत्पादन शून्य झाले आहे. 

गोदावरी नदीत घेतली उडी 

दरम्यान पुराच्या पाण्यात नुकसान होऊन देखील प्रशासनाकडून कोणीही पाहणी करायला आलं नाही. त्यामुळे कदम हा शेतकरी खूप निराश झाला होता. ​या निराशेतुन त्यांनी काल एक व्हिडिओ बनवून आत्महत्येचा इशारा दिला होता. यानंतर आज सकाळी संतोष कदम यांनी गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, हे समजताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पुराच्या पाण्यात उडी घेऊन संतोष कदम यांना वाचवलं. 

अधिकाऱ्यांसोबत गावकऱ्यांची झटपट 

ग्रामस्थांच्या सतर्कतेने शेतकऱ्याचे प्राण वाचले आहेत. मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती प्रशासनापर्यंत पोहचली असता प्रशासकीय अधिकारी गावात दाखल झाले होते. या नंतर गावात दाखल झालेल्या प्रशासनातील अधिकारी आणि गावकऱ्यांमध्ये थोडी झटापट झाली. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foods to clean heart vessels: 'या' पद्धतींनी लगेच वितळेल धमन्यांमध्ये जमा झालेली चरबी; हृदयाच्या रक्तवाहिन्या होतील एकदम स्वच्छ

मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याच्या पुतण्यासह तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update : निलेश घायवळ विरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस

Tanya Mittal: किती खोटं बोलशील...? तान्या मित्तल चुकीचे वय सांगून केला वाढदिवस साजरा; नेटकऱ्यांनी केली पोलखोल

Buldhana : खड्डा चुकवायला गेला अन् घात झाला, केळीचा ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT