Nanded Rain Saam TV
महाराष्ट्र

Nanded Weather: नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा; बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

Nanded Rain News: मृग नक्षत्रला सुरुवात झाली असली तरी नांदेड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मान्सूनचे आगमन नांदेड जिल्ह्यात झाले.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : राज्यातील अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. अनके ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने पेरणीच्या कामांना देखील सुरवात झाली आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात अद्याप पर्यंत पाऊस आलेला नाही. मान्सूनचा पाऊस लांबल्याने बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली अणे. यामुळे नवीन मोंढा बाजारात शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. 

मृग नक्षत्रला सुरुवात झाली असली तरी (Nanded) नांदेड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मान्सूनचे आगमन नांदेड जिल्ह्यात झाले. परंतु जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचे आगमन झाली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३० पूर्णांक १० मिलीमीटर इतक्या कमी पावसाची (Rain) नोंद झाली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मागील वर्षी देखील अशीच परिस्थिती होती. यानंतर यंदा देखील तीच परिस्थिती येते कि काय या विचाराने शेतकरी चिंतेत आहे. 

बियाणे खरेदी थांबली 

दरम्यान पाऊस लांबल्याने (Farmer) शेतकऱ्यांनी बी बियाणे आणि खते खरेदी करण्याकडे बी बियाणे बाजाराकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी या दिवसात नांदेडच्या नवीन मोंढा बाजारात शेतकऱ्याची खरेदीसाठी मोठी गर्दी असते. मात्र यंदा पाऊस लांबल्याने शुकशुकाट पहावयास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: तिसऱ्या टी-२० साठी भारताच्या प्लेइंग ११ मध्ये होणार मोठे बदल; २ खेळाडूंना मिळणार बाहेरचा रस्ता

High Blood Pressure: BP नियंत्रणात ठेवण्यासाठी ही 5 पदार्थ खाणं अजिबात टाळू नका

Amruta Khanvilkar : क्या खूब लगती हो, बडी सुंदर देखती हो, पाहा अमृताचं लेटेस्ट PHOTOS

Accident News : पुण्यात हिट अँड रनचा थरार! मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारने उडवलं

Ardha Kendra Yog: 30 वर्षांनंतर शनी-बुध बनवणार दुर्मिळ योग; या राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

SCROLL FOR NEXT