Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : विना परवाना बल्क मॅसेज केले प्रसारित; नांदेड उत्तर मतदारसंघातील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

Nanded News : विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा आता धडाडू लागल्या आहेत. निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आता मतदारांपर्यंत पोहचण्यावर अधिक भर देत आहेत.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासोबत निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली आहे. यात उमेदवाराला प्रचार करण्यासाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत. दरम्यान प्रचार करताना विना परवाना बल्क मॅसेज प्रसारित केल्याप्रकरणी नांदेडच्या उत्तर मतदारसंघातील तीन उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा आता धडाडू लागल्या आहेत. निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आता मतदारांपर्यंत पोहचण्यावर अधिक भर देत आहेत. यासाठी प्रत्यक्ष गाठी भेटी घेणे. तसेच सोशल मीडियाचा वापर करून प्रचार करत आहेत. मात्र हा प्रचार करताना उमेदवारासाठी निवडणूक आयोगाने काही नियमावली ठरवून दिली आहे. शिवाय निवडणूक आयोगाचे यावर लक्ष देखील असते. याचमुळे नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय बल्क मॅसेज प्रसारित केल्याने ही नोटीस बनवण्यात आली आहे. त्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार संगीता पाटील डक, शिंदे गटाचे उमेदवार आमदार बालाजी कल्याणकर आणि अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pasta Recipe: हॉटेलमध्ये ३०० रुपयांना मिळणारा पास्ता १० मिनिटांत बनवा घरीच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT