नांदेड : पितृपक्षामुळे कोणताही मंत्री मंत्रालयात गेला नाही आणि कुठलेही निर्णय सरकारने घेतले नाहीत; अशी जहरी टीका कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शिंदे- फडणविस सरकारवर केली आहे. (Nanded News Balasaheb Thorat)
कॉंग्रेस (Congress) नेते बाळासोब थोरात हे आज नांदेडमध्ये (Nanded) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अतिवृष्टीचे पंचनामे ही पितृपक्षामुळे रखडवले आहेत की काय? अशी उपरोधिक टीका देखील थोरात यांनी राज्य सरकारवर केली.
तेव्हा वंदे मातरम्ला आरएसएसचाच विरोध होता
सुरवातीला कॉंग्रेसच वंदे मातरम् आणि जय भारत म्हणत होते. तेव्हा आरएसएसच (RSS) याला विरोध करत होता. आता राज्य सरकार वंदेमातरम् म्हणण्याचा जीआर काढून सक्ती करत आहे. मुळात वंदेमातरम्, जय हरी, राम राम म्हणण्याचा सर्वांना वैयक्तिक अधिकार असल्याचेही थोरात म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.