Nanded News Saam Tv
महाराष्ट्र

Nanded News: नागपंचमीच्या दिवशी नागबर्डीमध्ये भरली नागदेवतेची मोठी यात्रा

Nag Panchami: नागपंचमीच्या दिवशी नागबर्डीमध्ये भरली नागदेवतेची मोठी यात्रा

साम टिव्ही ब्युरो

>> संजय सूर्यवंशी

नांदेडच्या कंधार तालुक्यातील गुंडा नागबर्डी येथे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची मोठी यात्रा भरली. निसर्गाचे संवर्धन आणि संगोपनाची परंपरा ही यात्रा चालवत आहे. या यात्रेत हजारो भाविकांनी येऊन नागोबाचे दर्शन घेतलं. नवसाला पावणारा नागोबा, अशी याची ख्याती आहे.

बाहेर देशातून बहीण-भाऊ उदरनिर्वाह करण्यासाठी कंधार तालुक्यातील दिंडा, गुंडा, बिंडा या गावाच्या परिसरात फिरत ते नागबर्डी माळरानावर येऊन एक मालकाची जनावरे चारत होते. यावेळी नागोबाच्या वारुळाला भावाने चार ते पाच खडे मारताच नागराज जागृत होऊन त्या भावाला नागदेवताने दंश केला.

त्याठिकाणी असलेल्या लिंबाच्या झाडाच्या पालाचा रस भावाला पाजल्यानंतर तो जिवंत झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते. नागराजाची मूर्ती तेव्हापासून आहे. तेव्हापासून लिंबाचे झाड तोडले जात नाही. झाडे तिथेच कुजली तरी शेतकरी झाड तोडत नाहीत.

दरवर्षी नागपंचमीला या माळरानावर नागराजाला दूध पाजविले जाते. नागराज केवळ नागपंचमीच्या दिवशीच त्या वारुळात येत असतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Latest Marathi News)

गुंडा नागबर्डी इथल्या सातशे वर्षांची परंपरा असलेल्या नागराजाच्या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी झालीय. निसर्गाचे संवर्धन आणि संगोपन करणारे देवस्थान म्हणून नागबर्डी प्रसिद्ध आहे. दरवर्षी पंचमीच्या निमित्ताने इथे यात्रा भरत असते. या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून विकास कामे केले जात असून हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सांगितलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT