Nanded Ashok Chavan News AI Image
महाराष्ट्र

Shocking : खासदार अशोक चव्हाणांच्या शोरूममध्ये चोरी, नांदेडमध्ये धक्कादायक घटना

Nanded Ashok Chavan News : नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण यांच्या जया हुंडाई शोरूममध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी संपूर्ण तिजोरीच पळवली. पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

नांदेडमध्ये चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या मालकीच्या जया हुंडाई कार शोरूममध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी शोरूममधील पैसे किंवा इतर वस्तू चोरण्याऐवजी थेट तिजोरीच घेऊन पळ काढला. ही संपूर्ण घटना शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री सुमारे ९ वाजून ३ मिनिटांनी दोन चोरटे शोरूममध्ये शिरले. रात्रीच्या वेळी शोरूममध्ये कोणी नसल्याची संधी साधत त्यांनी चोरीचा डाव आखला. त्यानंतर त्यांनी शोरूममधील तिजोरी उचलली आणि तेथून पळ काढला. काही वेळातच चोरट्यांनी तिजोरीसह घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोरूमची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच शोरूममधील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या चोरट्यांच्या हालचालींच्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चोरट्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, चोरट्यांनी पळवून नेलेल्या तिजोरीमध्ये नेमकी किती रक्कम होती, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे चोरीला गेलेल्या रकमेचा आकडा स्पष्ट झालेला नाही. भरवस्तीत असलेल्या कार शोरूममध्ये अशा प्रकारे तिजोरीच पळवून नेल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस या चोरट्यांपर्यंत कधी पोहोचतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशात भाजपविरोधात नवी रणनीती? सपा-काँग्रेसचा मास्टरप्लॅन तयार, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

राज्य सरकारचं विद्यार्थ्यांसाठी खास गिफ्ट, २६ हजार तरूणांना होणार फायदा, वाचा नेमका काय आहे प्लान

Maharashtra News Live Update: श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सीईओ जितेंद्र मिश्रा यांची साई संस्थानला भेट

Snake Facts: मुंगूसच नाही! सापाच्या विषाचा 'या' ५ प्राण्यांवर होत नाही परिणाम; नावं ऐकून व्हाल थक्क

Bike Engine Warm Up: थंडीत बाईक स्टार्ट केल्यानंतर किती वेळ थांबावं? इंजिन गरम करणं का गरजेचं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT