Police investigate the scene after a deadly gang clash near Canal Road in Nanded where three people lost their lives. Saam Tv
महाराष्ट्र

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Nanded Gang War Latest News Today: नांदेडमध्ये मध्यरात्री झालेल्या भीषण गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू झाला. कॅनाल रोड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड: राज्यात मागील काही दिवसांपासून दररोज खून आणि हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ कारणांवरून वाद होणे, खुन्नस काढण्यासाठी चाकूने हल्ले करणे अशा प्रकारांमध्ये विशेषतः तरुणांचा सहभाग वाढताना दिसत आहे. अशातच नांदेड शहरात मध्यरात्री घडलेल्या एका हाणामारीच्या घटनेने संपूर्ण हादरून गेले आहे. शहरातील कॅनाल रोड परिसरात, डी मार्टच्या जवळ असलेल्या या रक्तरंजित राड्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. टोळीयुद्धातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलीस घटनेचा तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास घडली. कॅनाल रोडवरील डी-मार्टजवळ अचानक काही तरूणांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. ही हाणामारी इतकी भयानक होती की यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. यापैकी दोन जणांचा मृत्यू जागीच झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गँगवारमधून रक्ताचा सडा

ही हाणामारी नेमकी काशामुळे झाली याचे कारण अजूनतरी समजले नसून मात्र ही घटना गँगवारमधून घडल्याची सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसराची नाकेबंदी करून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी ही त्याठिकाणी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक टीमला देखील आणण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT