Nanded News x
महाराष्ट्र

Nanded : 20 वर्षापासून शारीरिक आणि मानसिक छळ; बायकोनं हात मोडला, डोळा अपंग केला, कंटाळून पतीनं धक्कादायक निर्णय घेतला

Nanded News : नांदेड शहरातील गोवर्धन घाट पुलावरुन एका व्यक्तीने गोदावरी नदीपात्रामध्ये उडी मारली. या व्यक्तीने बायकोच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

Nanded News : नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बायकोच्या छळाला कंटाळून एकाने गोदावरी नदीच्या पात्रामध्ये उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. नदीपात्रामध्ये उडी मारण्याआधी या व्यक्तीने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव अशोक कांबळे असे आहे. नांदेड शहरातील गोवर्धन घाट पुलावरुन गोदावरी नदीपात्रामध्ये अशोक कांबळे यांनी उडी मारुन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. जीवन रक्षक दलाच्या जवानांनी नदीच्या पात्रातून बाहेर काढून अशोक यांचे प्राण वाचवले.

अशोक कांबळे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये त्यांनी बायकोच्या त्रासाला वैतागून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. २० वर्षांपासून बायको शारीरिक आणि मानसिक छळ करत आहे. बायकोने माझा हात मोडला आणि डोळा अपंग केला असे लिहून अशोक यांनी बायकोवर आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप केला आहे. नदीतून बाहेर काढल्यानंतर अशोक कांबळे यांना नांदेडच्या विष्णूपुरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

नांदेडमध्ये अशोक कांबळे या व्यक्तीने नदीमध्ये उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जीवन रक्षक दलाच्या जवानांनी अशोक यांचे प्राण वाचवले. अशोक यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत मागील वीस वर्षांपासून बायको शारीरिक आणि मानसिक छळ करत आहे, असा उल्लेख केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT